Breaking News

Tag Archives: medical education minister

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग केंद्र सुरू करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांची माहिती

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, आयुष, आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द व होमिओपॅथी चिकित्सापद्धत अशा सर्व महाविद्यालयात डॉक्टर,रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित योग करण्यासाठी योग केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याठिकाणी तज्ञ योग प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री गिरीश महाजन यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ‘हे’ निर्देश आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत सुसुत्रता ठेवा

राज्यातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसुत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया राबवावी. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू …

Read More »

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी खर्चासही मान्यता

रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्नीत ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून याकरीता रु. १०५.७८ कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी माहिती दिली. मंत्री गिरीष …

Read More »

वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला ‘हा’ निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित

देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी आज संवाद साधला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. …

Read More »

वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा सुरु करा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचे आदेश

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालयांमध्ये एमआरआय व सिटी स्कॅन सेवा कार्यान्वित आहेत. मात्र, वाढती रुग्ण संख्या असल्याने त्याकरिता प्रतिक्षायादी आहे. त्यामुळे या रुग्णालयात अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा निर्माण करुन तात्काळ एमआरआय व सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करुन देण्याच्या तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना …

Read More »

गिरीश महाजन यांची स्पष्टोक्ती, कोरोना काळात मागे पडलेले अभियान पुन्हा सुरु राज्यात अवयवदान जनजागृती अभियान

महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान उद्यापासून राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अवयवदानाबाबतची चळवळ यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना राबविली होती. त्यावेळी अवयव …

Read More »

तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केली. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व …

Read More »

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरणार

वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरण्यात येणार आहे. सदर पदभरती प्रक्रिया टी.सी. एस. आयओएन या कंपनीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील पदे १०० टक्के प्रमाणात भरण्यास ५ मे २०२१ रोजी मान्यता देण्यात आली आहे. …

Read More »

आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या मदतीतून वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रूग्णालय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

सर्वसामान्यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत असून यासाठी आगामी काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालये स्थापन करण्याची व श्रेणीवर्धन करण्याची कार्यवाही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या (आयएफसी) मदतीने सुरू असून, यासंदर्भातील कामाबाबत …

Read More »