Breaking News

आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या मदतीतून वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रूग्णालय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

सर्वसामान्यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत असून यासाठी आगामी काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालये स्थापन करण्याची व श्रेणीवर्धन करण्याची कार्यवाही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या (आयएफसी) मदतीने सुरू असून, यासंदर्भातील कामाबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे आयुक्त विरेंद्र सिंह, आयएफसीचे प्रतिनिधी पंकज सिंन्हा, हर्षा कुंभचंदानी उपस्थित होते.

महाजन म्हणाले की, राज्य शासनाने सन २०३० पर्यंत सर्वांना परवडणाऱ्या उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा (Tertiary Helath care) पुरविण्याचे उद्दिष्ट ठरविलेले आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे राज्य शासनाने निश्चित केले असून त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय विकसित करणे आणि सर्वांना परवडणाऱ्या दर्जेदार आरोग्य सेवा पुरविणे याकरिता आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांना महाराष्ट्र शासनाचे रणनीती सल्लागार म्हणून करारबद्ध करण्यात आले आहे.

सार्वजनिक-खाजगी भागीदारीवर राज्यात वैद्यकीय महाविद्यालये, सुपर स्पेशालिटी रूग्णालये स्थापन करणे आणि त्यांचे श्रेणीवर्धन करणे याबाबतच्या कामांना येणाऱ्या काळात गती देण्यात द्यावी, असे निर्देशही यावेळी दिले.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, आरोग्य सेवा कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये उभारणे आणि आरोग्य सेवा विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. २०३० पर्यंत सर्वांना परवडणारी आरोग्य सेवा पुरविणे, वैद्यकीय शिक्षणाचे व आरोग्य सेवांचे राज्यभरात श्रेणीवर्धन करणे, विद्यमान मनुष्यबळामध्ये कार्यक्षमता वाढविणे आणि काही उद्दीष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा विकसित करणे ही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची उद्दीष्टे ठरविण्यात आली आहेत. ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

लातूर, नागपूर, यवतमाळ आणि औरंगाबाद येथे उभारण्यात आलेली अतिविशेषोपचार रूग्णालये तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी कामांना गती द्यावी व त्यासंदर्भातील अहवाल कालमर्यादेत सादर करण्यात यावेत. जळगांव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *