Breaking News

Tag Archives: legislative council election

भुयारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, कशाला पराचा कावळा करताय… असं बोलत असतात असे सांगत दुर्लक्ष करण्याचे आवाहन

Ajit Pawar

विधान परिषद निवडणूकीसाठी येत्या २० जून रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत झालेल्या दगाफटक्याची पुर्नरावृत्ती होवू नये यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या खबरदारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना …

Read More »

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार भुयार यांचा टोला, संजय राऊतांना मतपेटी… राऊतांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर भुयार यांनी लगावला टोला

काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणूकीच्या दरम्यान महाविकास आघाडीकडे संख्याबळ असतानाही शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महाविकास आघाडीतील मते फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांची नावे घेत यांचीच मते …

Read More »

सदाभाऊ खोतांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून अमोल मिटकरींचा टोला ट्विटवरून लगावला टोला

विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीशी दोन हात करण्याच्या उद्देशान भाजपाकडून अपक्ष आमदार म्हणून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला. परंतु अखेर क्षणी अर्ज माघार घ्यायला लावला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठवित ट्विट करत टोला लगावला. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास …

Read More »

विधान परिषद निवडणूकीत भाजपा-राष्ट्रवादीच्या दोघांनी अर्ज मागे घेवूनही चुरस कायम भाजपा पुरस्कृत सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जेंची माघार

राज्यसभा निवडणूकीनंतर विधान परिषदेच्या १० जागांसाठी भाजपा आणि महाविकास आघाडीत समझौता होवू शकला नाही. त्यामुळे अखेर विधान परिषदेत १० जागांसाठी ११ उमेदवार उभे राहिल्याने निवडणूक होत असून भाजपाकडून ५ तर महाविकास आघाडीचे ६ उमेदवार रिंगणात आहेत. तर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा प्रत्येकी एक उमेदवार मागे घेतला. त्यामुळे आता विधान …

Read More »

राष्ट्रवादीकडून खडसे, नाईक आणि गर्जेंनी तर भाजपाकडून खोत यांचा अर्ज भाजपाकडून सहावा उमेदवार तर राष्ट्रवादीकडून एक डमी

विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. मात्र काल संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली नव्हती. मात्र बैठकांवर बैठकांचे सत्र सातत्याने सुरु होते. अखेर आज सकाळी पुन्हा एकदा पक्षाच्या नेत्यांची अंतिम बैठक होत विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी …

Read More »

काँग्रेसकडून “या” दोघांना विधान परिषदेसाठी उमेदवारी अशोक भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना जाहिर

विधान परिषद निवडणूकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस श्रेष्ठींकडून दोन उमेदवारांच्या नावाला संमती दर्शविली आहे. यामध्ये मुंबई काँग्रेसचे अशोक भाई जगताप आणि थोडेसे अडगळीत पडलेले चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील काही महिन्यामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशोक भाई जगताप यांची स्थानिक स्वराज्य …

Read More »

विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या “या” उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज मंत्री सुभाष देसाईं घरी बसणार का?

राज्यसभेच्या निवडणूकीचा धुरळा खाली बसत नाही, तोच आता विधान परिषद निवडणूकीची वावटळ सुरु झाली. या वावटळीत शिवसेनेकडून अधिकृतरित्या नाव जाहीर झाली नाहीत. मात्र आज शिवसेनेकडून माजी मंत्री सचिन अहिर आणि नंदूरबार येथील आमश्या पाडवी या दोघांना उमेदवारी जाहिर झाली. तसेच या दोघांनी आज विधानभवनात येवून विधान परिषदेकरीता अर्जही भरला. वाचा …

Read More »

सदाभाऊ खोतांना भाजपाचा निरोप, “विश्रांती घ्या” विधान परिषद निवडणूकीत पत्ता कट

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी भाजपाचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आता विश्रांती घ्या असा निरोप आल्याचे कळते. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीतून खोत यांचे नाव मागे पडले आहे. विधान परिषदेच्या १० जागासाठी निवडणुका जाहीर झाल्या असून २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत …

Read More »

खडसेंनी व्यक्त केली नाराजी फायदा झाला पंकजा मुंडे गटाला डमी उमेदवाराचे रमेश कराड झाले आमदार

मुंबई: विशेष प्रतिनिधी सत्तेत असताना खोट्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला आणि विधानसभे पाठोपाठ परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या नेत्यांविरोधात टिकेची तोफ डागली. मात्र त्यांच्या तोफ डागण्यामुळे पंकजा मुंडे यांच्या गटाचे रमेश कराड यांच्या गळ्यात अचानक अधिकृत उमेदवारीची माळ पडून ते बिनविरोध निवडूण आले. त्यामुळे …

Read More »

दोन पक्षाच्या त्या चौघांनी माघार घेतल्याने मुख्यमंत्र्यांसह ९ जण बिनविरोध शिवसेनेच्या शिष्टाईला यश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये या विषाणूची बाधा विधिमंडळ सदस्यांनाही होवू नये यासाठी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईमुळे भाजपाचे चार, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार विधान परिषदेतवर बिनविरोध …

Read More »