Breaking News

Tag Archives: health minister

आरोग्यमंत्री डॉ.सावंतांच्या त्या घोषणेमुळे शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प फुटला? घोषणा करण्याच्या नादात फडणवीसांनी केले सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाचे उल्लंघन

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात या अनुषंगाने जवळपास सर्वच राजकिय पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिंदे-फडणवीस सरकारचा आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. मात्र साधारणतः अर्थसंकल्प सादर होण्याआधी त्यातील एखादी घोषणा जर बाहेर आली तर अर्थसंकल्प आधीच …

Read More »

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा, म.फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन वाढविली-विधानसभेत

महाराष्ट्रात २ जुलै २०१२ पासून राबविण्यात येणारी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे या …

Read More »

शनि देवस्थानला १ कोटीची देणगी देणाऱ्या ओडिसा मंत्र्यावर गोळीबार पोलिस कर्मचाऱ्यानेच केला गोळीबारः रूग्णालयात उपचार सुरु

अनेक नागरीक आपल्या संकटाच्या किंवा अडचणीच्या काळात आपल्यासमोरील अडचणीचा डोंगर कमी व्हावा यासाठी कोणत्या तरी भोंदू भविष्यवेत्याने दिलेल्या सल्ल्यानुसार महाराष्ट्रातील शनी देवाचा धावा करतो. त्यामुळे अनेकजण अंधश्रध्देचे बळी ठरतात. ओडिसातील बीजेडीचे नेते तथा पटनाईक यांच्या मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री नाबा दास यांनी काही दिवसांपूर्वी शनि शिंगणापूर देवस्थानला भेट देत १.७ किलो …

Read More »

बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार या संस्था आणि व्यक्तींना जाहीर डॉ. प्रमोद पोतदार, डॉ.उमेश कदम, डॉ. सदानंद राऊत, संदीप आचार्य मानकरी

सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उस्मानाबाद येथील हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या पुरस्कार बाबतची माहिती देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावणार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा २७ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ संपन्न

राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान असून, राज्यात १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. सोलापूर जिल्हा साखर पट्टा असून या भागाचा विकास महत्वाचा आहे. त्या पार्श्वभूमीवर रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तत्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. …

Read More »

नागपूर येथील विधिमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या तान्ह्या बाळासोबत विधानभवनात आल्यानंतर कक्षाची सुरुवात

नागपूर येथील विधिमंडळांच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सौ. अहिरे यांच्याच हस्ते …

Read More »

गोवरच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या लसीकरणावर भर

गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईसह राज्यात बालकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे दिली. मंत्रालयात प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना माहिती दिली. डॉ. सावंत यांनी सांगितले …

Read More »

आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची गरज सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत

सुदृढ महाराष्ट्राची संकल्पना राबविण्यासाठी आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघ, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने महिला पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई …

Read More »

तानाजी सावंत म्हणाले, सत्तांतरानंतर आता तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली लगेच वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता

काही दिवसांपूर्वी हाफकिन नावाच्या माणसाकडून औषधे घेऊ नका, महाराष्ट्राला भिकारी करायची ताकद आहे, खेकड्यांनी धरण पोखरले सारखी वादग्रस्त विधाने करत नेहमीच चर्चेत राहणारे शिंदे गटाचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी काल रविवारी आणखी एक विधान करत एकच खळबळ माजवली आहे. त्यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण …

Read More »

नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्याचा जागर: तीन कोटी महिलांच्या चाचण्या करणार सार्वजनिक आरोग्य विभागाचे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’- प्रा. डॉ. तानाजी सावंत

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सव कालावधीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियान कालावधीत राज्यातील अठरा वर्षावरील सुमारे तीन कोटी महिलांच्या आरोग्याच्या विविध तपासण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे सांगितले. महिला ही घराचा …

Read More »