Breaking News

Tag Archives: guardian minister

पुढील २४ ते ४८ तासात बेस्ट ची सेवा पूर्ववत होणार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपवार पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन

बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, येत्या २४ ते ४८ तासात पूर्ववत करणार असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी परिवहनचे प्रधान सचिव पराग जैन, बीईएसटीचे आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते. बेस्टच्या ताफ्यात एकूण ३०५२ बसेस आहेत. …

Read More »

मुंबई उपनगरातील रस्ते दोन वर्षाच्या आत काँक्रीटकरण करणार पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा. सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतुकींच्या कोंडींचा सामना करावा लागत आहे, यासाठी तातडीने खड्डे भरण्यात यावेत. नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी मुंबई उपनगरातील सर्व रस्ते दोन वर्षाच्या आत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटकरण करण्याच्या …

Read More »

मुंबई शहरातील ३६५ कोटींच्या या कामांना मंजुरी शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावित- पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ च्या माध्यमातून ३६५ कोटी निधीचा नियतव्यय अर्थसंकल्प‍ित केला असून विकास आराखड्यातील कामांना बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावित, असे निर्देश शालेय शिक्षण व मराठी भाषा …

Read More »

भाग-१: मुख्यमंत्र्यांच्या शहरातील जिल्हा रूग्णालयात मोठा आर्थिक घोटाळा, आरोग्यमंत्री-पालकमंत्री गप्पच कॅग ऑडिटमध्ये ९० हजाराची मशिन ६ लाख ६१ हजारांना विकत घेतली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच भ्रष्टाचाराने बरबटलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराबाबत स्वतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कॅगने केलेल्या ऑडिटमध्ये उघडकीस आले आहे. मात्र याबाबतचा अहवाल उपसंचालक कार्यालय आणि आरोग्य मंत्री कार्यालयास पाठवून दिल्यानंतरही त्याबाबतची कोणतीही कारवाई आरोग्य मंत्री डॉ.तानाजी …

Read More »

मुंबई उपनगरसाठी ५१५ कोटी रूपयांचा प्रारुप आराखडा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ५१५.८६ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. चेतना कॉलेज, बांद्रा पूर्व येथे नियोजन समिती बैठक पार पडली या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री लोढा बोलत होते. मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी …

Read More »

६ डिसेंबरसाठी आंबेडकरी अनुयायांसाठी शिवाजी पार्कात ५० हजार चौरस.फु. वॉटरप्रुफ मंडप

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या सोयीसाठी राज्य शासन, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस यंत्रणा सज्ज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. अनुयायांनी …

Read More »

आगामी निवडणूकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारची ‘माझी मुंबई स्वच्छ मुंबई’ ची घोषणा

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीचा बिगूल जानेवारी-फेब्रुवारी २०२३ मध्ये कधीही वाजण्याची शक्यता गृहीत धरून शिंदे-फडणवीस सरकारकडून माझी मुंबई स्वच्छ मुंबई याची आज गुरवारी घोषणा केली. काही वर्षापूर्वी शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी माझी मुंबई स्वच्छ मुंबई हरीत मुंबई अशी घोषणा मुंबई महापालिका निवडणूकीसाठी दिली होती. त्यावेळी झालेल्या पालिका …

Read More »

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये हेरिटेज वॉक सुरू

मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त …

Read More »

सर्व वैद्यकिय सुविधा युक्त टेलिमेडिसिन केंद्राचे लवकरच उद्घाटन

राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी आणि सर्व तपासण्या गावातच आणि त्याही तात्काळ मिळण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पहिले पाऊल टाकले आहे. पालकमंत्री चव्हाण हे स्वखर्चाने न्यूरोसिनॅप्टीक कम्युनिकेशन प्रा. लि. कंपनीने विकसित केलेले “रेमिडी नोवा सोल्युशन्स …

Read More »

बागेसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवावे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदेश

आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवून परिसर सील करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. अंधेरी पश्चिम येथील के. ईस्ट वॉर्ड येथे आज झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार अमित साटम, भारती लव्हेकर सर्व विभागाचे अधिकारी आणि …

Read More »