Tag Archives: film city

सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांबाबत कामगार विभाग सकारात्मक कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती

सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशन मुंबईच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांचा सकारात्मक विचार करून या संदर्भात एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये फिल्म सिटी मधील सर्व संबंधितांचा समावेश केला जाईल असे आश्वासन …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी मनोरंजन क्षेत्रातील अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञान शिक्षणासाठी नवी मुंबई येथे एज्युकेशन सिटी उभारणार

जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वेव्हज परिषदेदरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी …

Read More »

मुंबईतील चित्रपटनगरीत मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत. येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात वेव्हज परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल …

Read More »

एन.डी.स्टुडीओ आता गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केली एन.डी.स्टुडीओची पाहणी

दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडीओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी (operations) ताब्यात घेतला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन.डी. स्टुडीओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे आता एन.डी.स्टुडीओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

चित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निश्चित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज घोषणा केली. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या (फिल्मसिटी) संचालक मंडळाची बैठक आज मंत्रालयात …

Read More »

मुंबईसह महाराष्ट्रातील चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण सांस्कृतिक व कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसिरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानगी एक खिडकी योजनेतून दिल्या जातात.  आता या योजनेचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत राबविल्या जाणाऱ्या एक खिडकी योजनेबाबतचे सादरीकरण आज सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांच्या …

Read More »