Breaking News

Tag Archives: farmers

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या शुभेच्छा देत म्हणाले, कष्टकरी, शेतकरी… प्रगतीशील महाराष्ट्र, गतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया

नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ..महाराष्ट्र आता थांबणार नाही…अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री …

Read More »

मंत्री जयकुमार रावल यांचे आदेश, राजशिष्टाचार विभागातील रिक्त पदे भरा वखार महामंडळाने शेतमाल साठवणूक क्षमता वाढवावी

वखार महामंडळ साठवणूक केलेल्या शेतमालाचा विमा उतरवून शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये सवलत देते. ही सुविधा निश्चितच शेतकऱ्यांच्या लाभाची आहे. शेतकरी हिताच्या सुविधा देणाऱ्या वखार महामंडळाने गोदामांचा विस्तार करून साठवणूक क्षमतेत वाढ करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन व …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

अवकाळी पावसामुळे येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत माजीमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र दिले आहे. माजी मंत्री छगन …

Read More »

हवामान विभागाचा अंदाजः २७-२८ डिसेंबरला राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खान्देश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील …

Read More »

निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याचीः अजित पवार यांचे पियुष गोयल यांना पत्र शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी पत्र लिहिले

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये …

Read More »

आरबीआयने शेतकऱ्यांसाठीची तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढविली आता २ लाखापर्यंतचे कर्ज विना तारण मिळणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १ जानेवारी २०२५ पासून शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्ज मर्यादा १.६ लाख रुपयांवरून २ लाख रुपये केली आहे. संपार्श्विक आणि मार्जिन माफ करून लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचा या निर्णयाचा उद्देश आहे. २ लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जाच्या गरजा, वाढत्या निविष्ठा खर्चाला संबोधित करणे आणि …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार, हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही वंचितचे आमदार निवडूण द्या

शासन कोणाचेही असो हमीभावाचा कायदा केल्याशिवाय राहणार नाही. असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील प्रचार सभेत केले. वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आजही बाजारात ५०० रुपये कमी भावाने कापूस विकत घेतला जातोय. १५०० ते २००० प्रमाणे सोयाबीन स्वस्त विकत घेतले जात आहे. …

Read More »

काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा सवाल, भाजपाने दिलेल्या त्या आश्वासनांचे काय? शेतकऱ्यांच्या शेतमालाला दिलेल्या आधारभूत किंमत, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींचे काय झाले

विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे जात आहे. या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत किंमत देण्यापासून ते स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. त्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपाला त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची आठवण करून देत त्याची उत्तरे मागितली आहेत. जयराम रमेश यांनी एक्सवर ट्विट …

Read More »

राहुल गांधी यांचा सवाल, उद्योगपतींना कर्जमाफी देणाऱ्या पंतप्रधानांकडून शेतकऱ्याची कर्जमाफी का नाही? मविआची सत्ता आल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये खटाखट, खटाखट जमा करु, शेतकरी कर्जमाफी व हमीभाव देऊ.

शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात पण ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते तर शेतकरी रस्त्यावर कशासाठी उतरले होते? भाजपाचे सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धान, सोयाबीन, कापसाला भाव देत नाही. देशातील मुठभर उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षात …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, ….त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही पंतप्रधान मोदींचे वर्तन विचार करायला लावणारे

राज्यातला शेतकरी सध्या संकटात आहे. त्यांच्याकडे सरकारचे लक्ष नाही. जो शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उदगीर मधील जाहीर सभेत केला. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातला शेतकरी सध्या संकटात आहे. त्यांच्याकडे सरकारचे लक्ष …

Read More »