Breaking News

Tag Archives: farmers

जयंत पाटील म्हणाले, या सरकारला वठणीवर आणायला हवे… हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा पार...

महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत केली जात होती. कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात होता मात्र हे सरकार आमदार सांभाळण्यात व्यस्त आहे. या सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपूरताच मर्यादित आहे. त्यामुळे या सरकारला वठणीवर आणायला हवे असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील …

Read More »

त्या सवालावर संभाजी राजेंनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहीत दिले ‘हे’ उत्तर मराठा आरक्षण लढा व त्यासंबंधीत चालू घडामोडींवर छत्रपती संभाजीराजे यांनी पोस्ट मधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत...

मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच बैठक पार पडली. त्या बैठकीत संभाजी राजे यांनी मराठा आरक्षण समितीच्या संयोजकांना बोलू दिले नसल्याचा आरोप एका संयोजकाने आज करत संभाजी राजे यांना मराठा समाजाचे नेतृत्व कोणी दिले? आम्हाला बोलायला का दिले नाही? असा सवाल …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शेतकरी आत्महत्यांप्रश्नी शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही शिक्षक भरती घोटाळा ‘व्यापम’सारखाच; चौकशी करून दोषींना शिक्षा द्या

राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी विरोध पक्ष सातत्याने लावून धरत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदतसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत परंतु शिंदे-फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चाही करत नाही, शेतकरी आत्महत्येविषयी हे सरकार गंभीर नाही, असा घणाघाती हल्ला …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची पत्राद्वारे शेतकऱ्यांना साद, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूया… छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया

राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन करत ‘रडायचं नाही, लढायचं…अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला. विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई

सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. सन २०२२ च्या माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यात …

Read More »

अशोक चव्हाण म्हणाले, झाडी- डोंगार- हाटिल ओक्के असतील, पण… विधानसभेत शिंदे सरकारवर केली टीका

झाडी, डोंगार, हाटिल ओक्के असतील, पण आज राज्यातील शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत, या शब्दांत महाराष्ट्राच्या सत्तांतर नाट्यावर चिमटा घेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांना सरसकट भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी विधानसभेत केली. नियम २९३ अन्वये विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, …

Read More »

छगन भुजबळ यांचा खोचक टोला, आता “स्कूल चले हम – जीएसटी के साथ” म्हणाव… महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची भावना दिल्लीत पोहोचवा

जीएसटी परिषदेने सुचविलेल्या दरवाढीला देशभरात विरोध होत आहे. ही तांत्रिक दरवाढ आहे असे उत्तर सरकारकडून दिले जात असले, तरी आताच ती करणे टाळता आले असते आणि राज्यातील आणि देशातील जनतेला या महागाईला तोंड द्यायची वेळ आली नसती छोट्या छोट्या गोष्टींवर जीएसटी लावणे हे अन्यायकारक असून किमान अन्नधान्य, शालेय साहित्य व हॉस्पिटल बिलावरील …

Read More »

नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांना डिझेलवर सबसीडी द्या जीएसटीवरील चर्चे दरम्यान केली मागणी

महागाईने जनता त्रस्त असून पेट्रोल, डिझेलचे दर अजूनही जास्तच आहेत. शेतकरी नेहमीच संकटाचा सामना करत असतो. शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच इतर शेती कामासाठीही डिझेलचा वापर केला जातो. सध्याचे डिझेलचे दर जास्त असून शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. राज्य सरकारने डिझेलवर शेतकऱ्यांना सबसीडी देण्याचा विचार करून बळीराजाला दिलासा द्यावा, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी घोषणा; नव्या मंत्र्यांना आवाहन दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत-एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करणार

मागील दोन तीन महिन्यापासून राज्यातील जवळपास सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आणि शेतजमीन खरवडून गेल्याचे तर उभ्या पिकात पाणी शिरल्याचे चित्र आजही पाह्यला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरीव मदत दिली जाणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली …

Read More »

राष्ट्रवादीचा मोदींना सवाल; उत्पन्नाचे सोडा, महागाईमुळे त्या गोष्टीही मिळेना शेतकऱ्यांच्या उत्पन्न आणि वाढत्या महागाईवरून साधला निशाणा

येत्या १५ ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. मात्र काही वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे जाहिर आश्वासन दिले. मात्र आता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसऱ्याबाजूला २०२२ मधील ६ महिने संपलेली असतानाही यातील …

Read More »