Breaking News

राष्ट्रवादीचा मोदींना सवाल; उत्पन्नाचे सोडा, महागाईमुळे त्या गोष्टीही मिळेना शेतकऱ्यांच्या उत्पन्न आणि वाढत्या महागाईवरून साधला निशाणा

येत्या १५ ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. मात्र काही वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे जाहिर आश्वासन दिले. मात्र आता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसऱ्याबाजूला २०२२ मधील ६ महिने संपलेली असतानाही यातील एकही गोष्ट पूर्ण झालेली नाही. यापार्श्वभूमी राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत उत्पन्नाचे सोडा आता महागाईमुळे खतं, अवजारेही मिळत नसल्याची टीका केली.

देश २०२२मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. तोपर्यंत आमचे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान मोदींना या आश्वासनाचं काय झालं? असा प्रश्न विचारला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला केवळ आठ दिवस बाकी आहे, याची आठवणही या व्हिडीओतून करून देण्यात आली आहे. देशातल्या शेतकऱ्यांचे २०२२मध्ये उत्पन्न दुप्पट होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. उत्पन्न दुप्पट व्हायचे सोडाच. पण जे उत्पन्न आधी मिळत होते, ते देखील खत, बियाणे, अवजारे यांच्या महागाईमुळे मिळेनासे झाले, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, अशी घोषणा केली होती. यासाठी २०१९मध्ये एक समितीही स्थापन करण्यात आली होती. तसेच या समितीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सात स्त्रोत सुचविले होते. त्यात पिकांची उत्पादकता वाढविणे, उत्पादन खर्चात कपात करणे, पशुधनाची उत्पादकता वाढविणे, अधिक मूल्य असलेल्या पिकांची लागवड, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात वाढ करणे, पीक घनता वाढविणे आणि शेती व्यवसायातून इतर व्यवसायात स्थलांतर करणे, यांचा समावेश होता.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *