Breaking News

Tag Archives: enforcement directorate-ED

उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मेहुण्याला दिलासा ईडीचा विरोध असतानाही सीबीआयचा अहवाल न्यायालयाने स्विकारला

राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय यंत्रणांकडून उध्दव ठाकरे यांच्या नातेवाईकांवर ईडीच्या धाडी पडण्यास सुरुवात झाली. तसेच उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीचे ६ प्लॅट्सही ईडीने जप्त केले. मात्र आता उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देवून तीन दिवसांचा कालवधी पूर्ण …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, केंद्रीय यंत्रणांकडून आमदारांना थेट फोन… केंद्र सरकारला अग्निपथ योजना मागे घेण्यास भाग पाडू; काँग्रेस पक्ष तरुणांसोबत

भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे चित्र देशभरात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांना भिती घालण्यासाठी या यंत्रणांचा सर्सास गैरवापर सुरु असून विधान परिषद निवडणुकीतही या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकला जात आहे. आमदारांना थेट फोन केले जात आहेत, याची सर्व माहिती आमच्याकडे असून …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा; सूडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही राहुल गांधींवरील ईडी चौकशीविरोधात राजभवनवर धडक मोर्चा

केंद्रातील भाजपा सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुल गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन …

Read More »

सोनिया गांधीना आलेल्या ईडी नोटीसीवर मंत्री थोरात म्हणाले, राजकीय संस्थेप्रमाणे… संपूर्ण देशातील जनता सोनिया व राहुल गांधी यांच्या पाठीशी

देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजपा सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी असून संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन हे सोनिया गांधी यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे …

Read More »

सोनिया गांधी, राहुल गांधीनाही ईडीची नोटीस; काँग्रेस म्हणते झुकेंगे ना डरेंगें नॅशनल हेराल्ड प्रकरणी नोटीस ८ जूनला चौकशीला बोलावले

बिगर भाजपा सरकारमधील अनेक मंत्री, आमदार आणि राजकिय नेत्यांना सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून नोटीस आणि धाडी टाकण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. आता एका प्रकरणात ईडीने थेट काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून ८ जून रोजी चौकशीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. …

Read More »

अनिल परब म्हणाले, जे रिसॉर्ट माझे नाही त्यावरून ईडीच्या धाडी, न्यायालयात जाणार ईडीचे अधिकारी गेल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली माहिती

दापोली येथील कथित रिसॉर्टप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानासह त्यांच्याशी संबधित सात ठिकाणांवर छापे मारी केली. जवळपास १२ तासाहून अधिक काळ ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल परब यांच्याकडील सर्व कागदपत्रांची आणि चौकशी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, दापोलीतील जे रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टची मालकी …

Read More »

संजय राऊत म्हणाले, धाडी टाकल्याने निवडून येतील असे वाटत असेल तर… राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला

नियोजित कार्यक्रमानुसार राज्यसभेच्या निवडणूकीकरीता शिवसेनेकडून प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे दोघेही आज आपले अर्ज भरणार होते. तत्पूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानासह त्यांच्याशी संबधित सात ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपाकडून दबावतंत्र सुरू …

Read More »

शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यावर अखेर ईडीची धाड शासकिय निवासस्थानासह सात ठिकाणी टाकले छापे

anil [arab

जवळपास मागील एक वर्षापासून भाजपाचे किरीट सोमय्या हे शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई होणार होणार असल्याचे सातत्याने सांगत होते. त्यानुसार आज सकाळीच परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या अंजिक्यतारा बंगल्यासह सातवे ठिकाणी ईडीने छापे टाकले. त्याचबरोबर दापोली रिसॉर्टसाठी पुण्यातील साठे नामक व्यक्तीकडून जमिन खरेदी केली …

Read More »

संजय राऊत म्हणाले, …तर केंद्रातील भाजपा सरकारने दाऊदची गचांडी पकडून आणावे मलिक यांच्यावरील न्यायालयाच्या ताशेऱ्यावरून राऊतांचा भाजपावर निशाणा

मागील काही महिन्यापासून ईडीच्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांच्यावर नुकतेच आरोप पत्र दाखल करण्यात आले. या आरोप पत्रात गोवावाला कंपाऊड खरेदी प्रकरणात आर्थिक गैर व्यवहार झाल्याचे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या साथीदारांशी संबध असल्याचे आणि आर्थिक व्यवहारात सहभागी असल्याचे उपलब्ध पुराव्यावरून स्पष्ट होत असल्याचे निरिक्षण विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल …

Read More »

विशेष न्यायालयाचे मलिकांवरील आरोपांबाबत निरिक्षण अन् फडणवीसांचा मविआला टोला म्हणे इतकी धडपड ओबीसी आरक्षणासाठी केली असती तर…

सध्या ईडीच्या तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मविआमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर नुकतेच आरोप पत्र दाखल करण्यात आले. या आरोप पत्रात करण्यात आलेल्या आरोपांबाबत तथ्य असल्याचे असल्याचे निरिक्षण विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी नोंदविल्यानंतर भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत खोचक टोलाही लगावला आहे. ही …

Read More »