Breaking News

संजय राऊत म्हणाले, …तर केंद्रातील भाजपा सरकारने दाऊदची गचांडी पकडून आणावे मलिक यांच्यावरील न्यायालयाच्या ताशेऱ्यावरून राऊतांचा भाजपावर निशाणा

मागील काही महिन्यापासून ईडीच्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांच्यावर नुकतेच आरोप पत्र दाखल करण्यात आले. या आरोप पत्रात गोवावाला कंपाऊड खरेदी प्रकरणात आर्थिक गैर व्यवहार झाल्याचे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या साथीदारांशी संबध असल्याचे आणि आर्थिक व्यवहारात सहभागी असल्याचे उपलब्ध पुराव्यावरून स्पष्ट होत असल्याचे निरिक्षण विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल एन. रोकडे यांनी नोंदविले.

त्याचबरोबर कुर्ला येथील गोवाला कंपाऊंड प्रकरणी मलिकसह डी-कंपनीच्या सदस्य हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांनी मुनिरा प्लंबरची प्रमुख मालमत्ता हडप करण्याचा गुन्हेगारी कट रचला. प्रथमदर्शनी पुरावे आहेत की आरोपी मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात थेट आणि जाणूनबुजून सहभागी आहेत, म्हणून त्यांना पीएमएलएच्या कलम ३ आणि कलम ४ अंतर्गत आरोपी केले जात असल्याचे मतही न्यायाधीश रोकडे यांनी व्यक्त केले.

त्याबाबत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, केंद्र सरकारने आधी दाऊदला पाकिस्तानातून फरफटत आणले पाहिजे. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जाऊन लादेनला मारले तसं भाजपाच्या केंद्र सरकारने दाऊदची गंचाडी पकडून मुंबईला आणला पाहिजे. तो मोठा गुन्हेगार आहे तर त्याला तिथे मोकळा का सोडला आहे. मुळात दाऊद जिवंत आहे की नाही हे आधी तुम्ही स्पष्ट करावे. दाऊद कुठे आहे आणि काय करत आहे हे केंद्र सरकारला माहिती आहे. तुम्ही जगातील इतके मोठे नेते आहात. दाऊद तुमच्यासमोर मच्छर आहे त्याला पकडून घेऊन या असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील टोला लगावला.

एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचे आम्ही ऐकत होतो. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठे नव्हते. पण अटल बिहारी वाजपेयी यांचे आदेश आम्ही पाळले. शरद पवार हे देशाचे जेष्ठ नेते आहेत. शरद पवारांचे मार्गदर्शन पंतप्रधान मोदी घेतात हे सगळ्यांना माहिती आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांना राजकारणाची माहिती कमी असल्याची खोचक टीका त्यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *