Breaking News

Tag Archives: education

चंद्रकांत पाटील म्हणाले, उर्वरित जागांसाठीही पदभरती प्रक्रिया राबविणार

प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून २ हजार ८८ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबची रोस्टर प्रक्रिया वेळेत पूर्ण करून उर्वरित पद भरती बाबतही  आढावा घेऊन टप्याटप्यांनी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल. या भरती प्रक्रियेबाबत शासन सकारात्मक असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील पुढे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिक्षण संस्थांचे महत्वपूर्ण योगदान शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाद्वारे आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे

शिक्षण हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून राज्याच्या शिक्षण विभागाचे काम पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने सुरू आहे. शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांनी देखील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व माध्यमांच्या …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबवा

राज्यातील १४ हजार शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे समजते. कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरिब व सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेड्यातील या शाळा बंद केल्या तर ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील …

Read More »

RTE कायदा असतानाही महाराष्ट्रात ५५ हजार मुलं शिक्षणापासून वंचित शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क’ अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळेच्या परिसरातील ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध …

Read More »

पुरपस्थितीमुळे इंजिनिअरींग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदत वाढ द्या उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री वायकर यांची परीक्षा आयुक्तांना सुचना

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने इंजिनिअरींग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रकियेस तात्काळ मुदत वाढ द्यावी, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांना दिल्या. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार …

Read More »

शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार निपटून काढणार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा

नागपुर: प्रतिनिधी राज्यातील शाळांमध्ये पट पडताळणी झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्ट अधिकारी-शिक्षकांवर कारवाई केली की, मॅटमध्ये जातात. संस्थाचालक, शिक्षक आणि अधिकारी यांची एक टोळीच राज्यात कार्यरत असून त्यांची सर्वकष चौकशी करून त्याची पाळेमुळेच खोदून काढणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. विधान परिषदेत लक्षवेधी …

Read More »

राज्यातील शैक्षणिक क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुधारीत विधेयक विधानसभेत मंजूर

नागपूर: प्रतिनिधी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार कार्पोरेट क्षेत्रातील किंवा खाजगी कंपन्यांना त्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सोशल रिस्पॉन्सबिलीटी फंड) खर्च करण्यासाठी शाळा स्थापन करण्याची मुभा राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या खाजगी कंपन्यांना शैक्षणिक संस्था सुरु करणे सोयीचे व्हावे यासाठी स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) या कायद्यात …

Read More »