Breaking News

Tag Archives: dy chief minister

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, राज्यातील ‘या’ पोलिसांना दिडपट वेतन

राज्यातील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आणि गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत दिली. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी …

Read More »

२० हजारांची भरती, विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव यासह राज्य मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे असे १४ निर्णय घेण्यात आले आहेत. यातील परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ, विद्यापीठ कायद्यातील महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले विधेयक मागे घेण्याचा निर्णय आदी निर्णय स्वतंत्र बातम्यांच्या माध्यमातून याच संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या निर्णयाशिवाय …

Read More »

पालकमंत्री नियुक्तीवरून अजित पवार म्हणाले, माझ्या नाकीनऊ आलं होतं ते कसं… कसे सांभळणार सहा सहा जिल्हे

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर शनिवारी पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे. शिदे-फडणवीस सरकारमधील विविध नेत्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण देवेद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ

समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. माजी …

Read More »

लव्ह जिहादच्या मुद्यावरून काँग्रेसने विचारले उपमुख्यमंत्री फडणवीसांना ‘हे’ दोन प्रश्न फोन रेकॉर्डींग आणि लव जिहाद असल्याचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यावरून साधला निशाणा

अमरावती येथील धारणीतील रुक्मिणी नगर परिसरातून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीला एका मुस्लिम तरूणाने पळवून नेऊन तिच्या मनाविरोधात लग्न केल्याचा आरोप करत हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा कांगावा भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा आणि भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केला. मात्र मुलीचा शोध लागल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, फडणवीस कोठेही जाणार नाहीत… पुण्यातून खासदारीसाठी तिकिट द्याच्या मागणीवर व्यक्त केली प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ब्राम्हण महासंघातील संबध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्याबद्दल नाराजी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र पाठवित उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी कटिबद्ध पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने तसेच सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुणे मंडळ म्हाडाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज, राज्य सरकारने दिली हमी ठाणे कोस्टल रोड, भुयारी मार्ग, शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी कर्ज

एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतरावर शिंदे-फडणवीस सरकारकडून शिक्कामोर्तब औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नामांतर

अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र या स्थगितीवरून सर्वचस्थरातून टीका व्हायला लागल्यानंतर …

Read More »