Breaking News

Tag Archives: dy chief minister

शिंदे-फडणवीस सरकारची आमदारांना खुली ऑफर, गडबड करायची नाही दुबईला प्लॅट मिळेल

राज्यात शिवसेनेचे बंडेखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होऊन चार महिने झाले. या चार महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० जणांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. राज्य सरकारची अनेक खात्यांना अद्यापही कॅबिनेट मंत्रीच नाही. तसेच राज्यमंत्र्यांची नियुक्ती तर नाहीच नाही. यापार्श्वभूमीवर …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकाने नियुक्ती पत्र दिले मविआ काळात निवड झालेल्या उमेदवारांना

हिमाचल प्रदेश पाठोपाठ गुजरात विधानसभा निवडणूकीच्या तारखा आज जाहीर झाल्या. मात्र या दोन राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी रोजगार मेळावा घेत देशभरातील अनेक आधीच निवड झालेल्या बेरोजगार उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. अगदी त्याच पार्श्वभूमीवर राज्यातही शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

नाना पटोलेंचा आरोप, फडणवीस व भाजपाकडून पत्रकारांवर दबाब टाकण्याचा अश्लाघ्य प्रकार

प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत. सरकारला जाब विचारणे, त्यांच्या धोरणांवर टीका करणे हे त्यांचे कामच आहे परंतु लोकशाही व संविधानाला न मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पत्रकारांना HMV (His Masters Voice) असे संबोधित करून गुलामाची उपमा देणे हा दबाव टाकण्याचा अश्लाघ्य प्रकार आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडूनच असा प्रकार होत असेल तर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेबरोबर गेलेल्या बच्चू कडू आणि नाणार संदर्भात देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य बच्चू कडू मी फोनवर सांगितल्यानंतर ते शिंदेसोबत गेले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित शिवसेनेतील ४० आमदारांबरोबरच शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या १० अपक्ष आमदारांनाही सोबत नेले. यात बच्चू कडू यांचाही समावेश होता. मात्र बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कसे गेले याची माहितीच देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. त्याचबरोबर नियोजित नाणार प्रकल्पाबाबतही महत्वाचे …

Read More »

तीन उद्योगाच्या बदल्यात एक उद्योग राज्याला मंजूर, पण अर्थसंकल्पात जाहिर होणार

राज्यातून दिड लाख कोटी गुंतवणूकीचा वेदांता-फॉक्सकॉन आणि २१ हजार कोटींचा टाटा-एअर बस उद्योग गुजरातला गेला. त्यापाठोपाठ सॅफ्रन हा उद्योगही राज्यातून हैद्राबादला गेला. हे तीन मोठे उद्योग राज्यातून गेल्यानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक क्लस्टर अंतर्गत २ हजार कोटी रूपयांचा उद्योग मंजूर करण्यात आलेला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचा आघाडीवर हल्लाबोल, उद्योजक म्हणाले राज्यात औद्योगिक वातावरण नाही

मागील काही दिवसांपासून राज्यातून उद्योग जाण्यावरून एकप्रकारच्या खोट्या कथा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी उध्दव ठाकरे गट आणि एचएमव्ही पत्रकारांकडून अर्थात हिज मास्टर्स व्हॉइस (अर्थात त्यांच्या मालकांच्या इशाऱ्यावरून) हे काम सुरु आहे. जे उद्योग राज्यातून गेले ते आमच्या सरकारच्या काळात गेले नसून ते सर्व उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणतात, मला फिरायचं असतं, वाय प्लस सुरक्षा द्या

तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून सुरक्षा व्यवस्था न पुराव्याचे प्रकरण ताजे असतानाच आता व शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षव्यवस्थेत वाढ करण्यात आली. तर मागील काही दिवसात उध्दव ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांची सुरक्षा कमी करण्याचे प्रमाण वाढत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे पदूम आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपणास ऱाज्यभरात …

Read More »

बंजारा समाजाचा सत्कार स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आश्वासन

बंजारा समाजाच्या मागण्यांवर लवकरच एकत्रित बैठक घेऊन या मागण्या सोडविण्यात येतील. तसेच सिडकोच्या हद्दीत बंजारा समाजासाठी भूखंड देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने ठाण्यातील हायलँड मैदानातील कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचे १०० दिवस हारतुरे, सत्कार, देवदर्शन व खुर्ची वाचवण्यातच गेले

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थाने करुन पाडून शिंदे-फडणवीस सरकार येऊन १०० दिवस झाले. या १०० दिवसात ईडी सरकारने केवळ हारतुरे व सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत. राज्यात होत असलेली तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार आयुष्मान भारत हेल्थ कार्डचे वितरण

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’चे वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री प्रा. डॉ. …

Read More »