Breaking News

Tag Archives: dr tanaji sawant

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची १२ वी बैठक झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सार्वजनिक आरोग्य मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची नाबार्डला सूचना, शेतकऱ्यांच्या कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट लावू नका नाबार्डच्या बैठकीत पतधोरणावर बोलताना मुख्यमंत्र्यांची सूचना

“शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी …

Read More »

आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी दिला इन्फ्लूएंझाबाबत ‘हा’ इशारा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा दक्ष

राज्यात सध्या एच३एन२ या इन्फ्लूएंझा ‘ए’ च्या उपप्रकाराचा प्रादुर्भाव वाढल्याचे व रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, याबाबत आरोग्याच्या सर्व संस्थांना सर्वेक्षण वाढविण्याच्या आणि उपचाराबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती, आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. …

Read More »

कोविड काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आश्वासन

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेतील समायोजन कसे करता येईल याबाबतचा एक अभ्यासगट ३१ मार्चपूर्वी तयार करण्यात येईल. या अभ्यासगटाने दिलेल्या अहवालानंतर याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. विधानसभा सदस्य प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश, इन्फ्लूएंझाग्रस्त रूग्णावर तातडीने उपचार करा वेळीच उपचार सुरु करण्याबाबत जनजागृती करावी

इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. राज्यात नव्याने उद्भवलेल्या इन्फ्लूएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजाराविषयीची आढावा …

Read More »

भाग ३- आरोग्य यंत्रणेतील भ्रष्ट डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा बळी ठरलेल्या गरोदर महिलेला न्याय कधी मिळणार ? सरकार सर्वसामान्यांचे कि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांचे?

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने आणि जाहिर कार्यक्रमातही हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सांगत मुंबईसह महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी अपघात घडला किंवा नैसर्गिक दुर्घटना घडली तर संबधित व्यक्तीच्या वारसांना तातडीने मदत जाहिर करून जखमींवर शासकिय खर्चात उपचार करण्याचे आदेश देतात. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातीलच एका रूग्णालयात एका डॉक्टरच्या …

Read More »

भाग-२: जिल्हा रूग्णालयात कोट्यावधीं रूपयांच्या करामती, फक्त पुरवठा दारांचा फायदा, शासनाचे नुकसान कॅगने सूचना करूनही अनेक गोष्टींची बिले, रजिस्टर दाखविलीच गेली नाहीत

ठाणे जिल्ह्यातील आदीवासी गावांपर्यंत योग्य ती आरोग्य यंत्रणा पोहोचली नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आला आहे. आदिवासींसह सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि त्याचा लाभ मिळावा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा म्हणून दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा निधी राज्य सरकारकडून जिल्हा नियोजन समिती तर विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो. …

Read More »

भाग-१: मुख्यमंत्र्यांच्या शहरातील जिल्हा रूग्णालयात मोठा आर्थिक घोटाळा, आरोग्यमंत्री-पालकमंत्री गप्पच कॅग ऑडिटमध्ये ९० हजाराची मशिन ६ लाख ६१ हजारांना विकत घेतली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच भ्रष्टाचाराने बरबटलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराबाबत स्वतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कॅगने केलेल्या ऑडिटमध्ये उघडकीस आले आहे. मात्र याबाबतचा अहवाल उपसंचालक कार्यालय आणि आरोग्य मंत्री कार्यालयास पाठवून दिल्यानंतरही त्याबाबतची कोणतीही कारवाई आरोग्य मंत्री डॉ.तानाजी …

Read More »

आरोग्यमंत्री डॉ.सावंतांच्या त्या घोषणेमुळे शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प फुटला? घोषणा करण्याच्या नादात फडणवीसांनी केले सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाचे उल्लंघन

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात या अनुषंगाने जवळपास सर्वच राजकिय पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिंदे-फडणवीस सरकारचा आणि अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. मात्र साधारणतः अर्थसंकल्प सादर होण्याआधी त्यातील एखादी घोषणा जर बाहेर आली तर अर्थसंकल्प आधीच …

Read More »

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा, म.फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन वाढविली-विधानसभेत

महाराष्ट्रात २ जुलै २०१२ पासून राबविण्यात येणारी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची उत्पन्न मर्यादा दीड लाखावरुन पाच लाख रुपये करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य डॉ. राहुल पाटील महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे या …

Read More »