Breaking News

Tag Archives: dr.anil bonde

फळबाग विमाचा पुढील २ वर्षाचा करार रद्द २०१९ च्या निकषाप्रमाणे नवीन निविदा काढाव्यात-डॉ. अनिल बोंडे यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे सरकारनी हवामानावर आधारित फळबाग विमा योजनाचे हवामानाचे निकष बदलवुन विमा कंपन्या सोबत २०२० ते २०२२ पर्यंत ३ वर्षाचा करार केला होता. या कराराने शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही फक्त कंपन्या मालामाल झाल्या. भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटविल्यानंतर शेवटी शासनाने माघार घेतली. आणि …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली मदत शेतकऱ्यांना फसविणारी भाजपाचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीने थैमान घातले असताना हवालदिल शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने भरीव मदत करणे गरजेचे होते परंतु महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर केले तरी त्यामधील कृषी पिके व घरे यासाठी ५,५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. जाहीर केलेल्या ९,७७६ कोटी रुपयांपैकी रस्ते पुलासाठी २,६३५ कोटी रुपये, नगर विकाससाठी ३०० कोटी,  महावितरण करीता २३९ कोटी रुपये, जलसंपदा करीता १०२ कोटी रुपये, ग्रामीण …

Read More »

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या ६ मजल्यावर फक्त मुख्यमंत्रीच पवार, खडसे, डॉ.बोंडेमुळे मविआचे मंत्री म्हणतात ६ मजला नको

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राज्य मंत्रिमंडळात सध्या ७ मंत्र्यांची निवड करण्यात आली. या मंत्र्यांना कोणती दालने मिळणार याबाबत उस्तुकता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी असलेल्या दालनात कोणताच मंत्री बसण्यास तयार नसल्याने सध्यातरी ६ व्या मजल्यावर फक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दालन राहणार आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला …

Read More »

“कृषी संवाद” च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मंत्र्याकडे मांडता येणार प्रश्न उपक्रमाचा कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते शुमारंभ

मुंबई : प्रतिनिधी एकाच वेळी राज्यातील १० हजार शेतकऱ्यांशी संवाद साधता येणाऱ्या “कृषी संवाद” या उपक्रमाचा शुभारंभ आज कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला. यावेळी अमरावतीसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांशी कृषीमंत्र्यांनी संवाद साधला.या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी मंत्री शेतकऱ्यांसोबतच कृषीमित्र, कृषी सहाय्यक यांच्याशी विविध बाबींवर संवाद साधणार आहेत. …

Read More »

बनावट खते, कीटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी बनावट खते, कीटकनाशके व बी-बीयाणे नियंत्रण संदर्भातील कायदा अधिक कडक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नमुना तपासणीमध्ये वारंवार बनावट व निकृष्ट दर्जाची खते, कीटकनाशके विक्री करत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करून परवाने रद्द करण्यात यावेत असे निर्देश देऊन …

Read More »

“हौस पुरवा महाराज, मला आणा एक १५ लाखाची गाडी” दोन महिन्यासाठी मंत्रीपद मिळूनही मंत्र्यांचा नव्या गाडीसाठी अट्टाहास

मुंबईः प्रतिनिधी साधारणतः दोन महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होत १३ नव्या चेहऱ्याचा समावेश करण्यात आला. मात्र या सर्वच मंत्र्यांना अवघा दोन महिन्याचा कालावधी मिळणार असताना यातील काही मंत्र्यांनी नव्या चारचाकी वाहनासाठी आपल्याच विभागाकडे हट्ट धरल्याची माहिती नुकतीच पुढे आली. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कँबिनेट मंत्री असलेल्या राजकुमार बडोले, विष्णू सवरा, प्रकाश …

Read More »

पीक विमा भरण्यास एक महिन्याची मुदतवाढ द्या धानाची रोपे (पऱ्हे) टाकल्यापासूनच पिक विमा लागू करण्याची विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी खरीप हंगामातील पिक विमा भरण्यापासून राज्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत, हे लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा भरण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या समाधानकारक पावसाअभावी अनेक भागात कमी प्रमाणात झालेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भात हा …

Read More »

८ कँबिनेट मंत्र्यांसह ५ राज्यमंत्र्यांनी घेतली पदाची शपथ बडोले,सवरा, महेता यांच्यासह तीन राज्यमंत्र्यांना नारळ

मुंबईः प्रतिनिधी गेली अनेक महिने होणार होणार मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चेला आज रविवारी पूर्ण विराम मिळाला. विखे-पाटील, क्षिरसागर, कुटे, खाडे यांच्यासह ८ कँबिनेट मंत्र्यांनी तर सागर, महातेकर, सावे यांच्यासह ५ राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य महत्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.विद्यासागर यांनी राजभवनात छोटेखानी झालेल्या समारंभात …

Read More »