Breaking News

Tag Archives: devendra fadnavis

निर्मला सीतारमण यांचा दावा, ९ वर्षांत देशाला मोदींनी दहशतवादापासून मुक्त… मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना, देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी केले. मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत …

Read More »

मविआच्या मागणीसाठी शिंदे-फडणवीसांचे पत्र, सत्तांतरानंतरही मोदी सरकारकडून केराची टोपली मुंबईकरांसाठी पंतप्रधान आवास योजनेसाठी उत्पन्न मर्यादा वाढविण्याच्या मागणीला केंद्राकडून नकारघंटा

साधारणतः वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी महाशक्तीच्या पाठबळावर राज्यातील शिवसेनेत बंड पुकारत भाजपा (BJP) च्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या उपस्थितीत मुंबई (Mumbai) तील विविध विकास कामांचे सलग तीन कार्यक्रमही घेतले. तसेच त्यानंतर प्रत्येक कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

रोहित पवार यांचा त्या कार्यक्रमावरून सवाल, बोलघेवडे चॉकलेट बॉय आता गप्प का? सावरकरांसाठी राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविले

देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन होत असतानाच भारतातील १९ राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. त्यामुळे देशातील विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील स्वातंत्र्यवीर सावरकर जंयतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आल्याने राज्यातील काँग्रेससह राष्ट्र्वादी काँग्रेसने केंद्र सरकारवर आणि …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य, …और मुझे रास्ते बनाने का समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील उद्घाटनानंतर केले वक्तव्य

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी २६ मे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिर्डीजवळील कोकमठाण येथे झालं. त्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी आणि कोपरगावातील शेतकऱ्यांचं आभार मानले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचा विकास …

Read More »

फडणवीसांच्या त्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर,… तर फेकण्यात तज्ञ मुख्यमंत्री गारूडी तर उपमुख्यमंत्री फेकण्यातले तज्ञ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी २४ मे रोजी भेट घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. कितीही सापनाथ-नागनाथ एकत्र आले, तरी मोदींना पराभूत करू शकणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. …

Read More »

राज्य सरकारची नवी घोषणा, अडीच लाखात झोपडीधारकाला घर; शासन निर्णय वाचा गृहनिर्माण विभागाकडून शासननिर्णय जारी

सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षरित्या शिंदे-फडणवीस सरकारवर अपात्रतेवर शिक्का मोर्तब केल्यानंतर राज्यात विधानसभा-लोकसभा निवडणूका घेण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. तर दुसऱ्याबाजूला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही जाहिर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर काहीही करून मुंबई महापालिका ठाकरे गटाच्या ताब्यातून हिसकावून घ्यायचीच याचा चंग बांधलेल्या भाजपा-शिंदे गटाने आता मुंबईकरांसह राज्यातील झोपडीधारकांना खुष करण्यासाठी अडीच लाख …

Read More »

नाना पटोले यांची थेट पोलिस महासंचालकाकडे मागणी, ती पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करा… पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा

पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून …

Read More »

विरोधकांच्या बहिष्कारावरून देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मग ते लोकशाही विरोधी होतं का? मोदींना विरोध करण्याचा ज्वर चढला

नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना बोलावलं नाही त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहेत. यासंदर्भातलं एक पत्रकही विरोधकांनी जारी केलं आहे. याबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी यावर खरमरीत उत्तर दिलं …

Read More »

आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना शेतकऱ्यांना दर्जेदार बी - बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे

राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार बी – बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज सकाळी राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०२३ चे …

Read More »

प्रताप सरनाईक म्हणाले,… शिंदे-फडणवीस दिलेला शब्द पाळतात मंत्री पदाचा शब्द दिलाय

शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते, आमदार प्रताप सरनाईक यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे की, तुम्हाला मंत्रीपद दिलं जाईल, असा दावा प्रताप सरनाईक यांनी केला. तसेच शिंदे-फडणवीस दिलेला शब्द पाळतात, असंही त्यांनी नमूद केलं. ते मंगळवारी …

Read More »