Breaking News

Tag Archives: covid-19

पुण्याला कोरोनामुक्त करण्यासाठी विप्रोचा पुढाकार ४५० खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार

मुंबई : प्रतिनिधी जागतिक माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने पुणे येथे ४५० खाटांचे विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच महाराष्ट्र शासनासमवेत केला. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजेवाडी येथे माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र …

Read More »

चला शासकिय कर्मचाऱ्यांनो ५ टक्के हजेरी लावा, पण कामकाज चालवा सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी

मुंबई: विशेष प्रतिनिधी एकाबाजूला कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागलेली आहे. मात्र प्रशासनाचा गाडा थांबू नये यासाठी मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्द, मालेगांव महानगरपालिका हद्दीतील सर्व शासकिय कार्यालये ५ टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी काम करण्यासाठी कार्यालयात आल्यानंतर संसर्ग होणार …

Read More »

कोविड फायदा: एसटी प्रवाशांना मिळणार ही सवलत परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ” स्मार्ट कार्ड ” योजनेला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के ते १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित …

Read More »

काँग्रेस मंत्र्यांचा निर्णय, अडकलेल्या मजूरांचा प्रवास खर्च उचलणार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगारांचा प्रवास खर्चाबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात अडकून पडलेल्या सर्व स्थलांतरित मजूरांच्या प्रवासाचा खर्च महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उचलणार आहे. यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाईन सुरु करून मजूरांची माहिती घेतली जाणार आहे व जिल्हाधिकारी व रेल्वे अधिका-यांना पत्र लिहून आवश्यक तो निधी …

Read More »

मुख्य सचिव म्हणाले, योजना पुढे ढकला, बदल्याही करायच्या नाहीत शासनाच्या सर्व विभागांना आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद आहेत. यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व विभागांनी नव्या योजना आणूच नये असे सांगत जितक्या म्हणून योजना आणि त्यावरील खर्च पुढे ढकलता येईल तितका पुढे ढकला असे सांगत कोणत्याही …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मे अखेर कोरोनामुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

मुंबई: प्रतिनिधी अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली, पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त , पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप …

Read More »

अजून थोडे दिवस कळ काढा, जाता येईल शेजारच्या जिल्ह्यात कंटेन्मेंटमधील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंदच राहणार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोवीड विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत असताना हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोनमधील बाधितांची संख्या कमी करण्यावर भर देणे आवश्यक असल्यामुळे आंतर जिल्हा प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत, जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहणार असल्याचे आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. …

Read More »

या महिन्यातही धान्य घेताना अंगठा लावायचा नाही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानातून अन्न धान्याचे वाटप करतांना सुरू असलेली ई पॉस प्रणाली मार्च आणि एप्रिल मध्ये शिथिल करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारच्या वतीने नव्याने ई पॉस प्रणाली पुन्हा सुरू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. मात्र राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज क्षेत्र …

Read More »

सामान्य प्रशासनाच्या आदेशाला “गुच्छ” मुळे महसूलकडून केराची टोपली त्या अधिकाऱ्यांना रूजू न करून घेण्याचे आदेश गृहनिर्माण विभाग लवकरच काढणार

मुंबई : विशेष प्रतिनिधी म्हाडा आणि एसआरएमधील अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पदावरील व्यक्तीची प्रतिनियुक्ती करायची असेल तर गृहनिर्माण विभागाची मंजूर घेणे आवश्यकच करण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला. तरीही महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या “गुच्छ” मुळे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित दोन अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती महसूल विभागाने केल्याचा …

Read More »

कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील ५१.०५ लाख लोकांचे सर्वेक्षण पूर्ण फक्त ९९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाबाधीत रूग्णांच्या अनुषंगाने आतापर्यंत ५१.०५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सद्यपरिस्थितीत ११ हजाराहून अधिक सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले असून ९९७ कंटेनमेंट झोन सक्रिय असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात …

Read More »