Breaking News

Tag Archives: covid-19

सोलापूरात ८ ने वाढ होत १५० चा टप्पा ओलांडला मृतकांची संख्या १० वर पोहोचली

सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज या संख्येत ८ ने वाढ झाली आहे. तर आज एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या आता १० वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत कोरोनाबाधीतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. दिवसभरात २ हजार ६३३ जणांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २ हजार २१६ …

Read More »

कोरोनाच्या नायनाटासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बनविले नॅनो कोटींग्ज मुंबई विद्यापीठ व स्वच्छ उर्जा अलाएन्सचे एकञित संशोधनातून अँटीव्हायरल नॅनो कोटींग्स तयार

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे एकीकडे सर्वसामान्यांना संसर्गाचा धोका असून कोरोना रुग्णांची सुश्रुशा करणाऱ्या वैद्यकिय सेवेतील डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनाही याची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विश्वनाथ पाटील आणि स्वच्छ उर्जा अलाएन्सचे डॉ. सुनील पेशणे व त्यांचा एक विद्यार्थी रोशन राणे यांनी …

Read More »

लॉकडाऊनमुळे राज्यातील २ कोटी २९ लाख कामगारांवर बेकारी? चार कोटी ५० लाख कामगारांपैकी फक्त २० लाख ४० हजारांचे नोकऱ्या शाबूत

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला जवळपास ४५ दिवस पूर्ण होत आहेत. याकाळात दैनंदिन जीवनात काम करणाऱ्या असंघटीत ४ कोटी ५९ लाख ५० हजार कामगार काम करत होते. मात्र यातील जवळपास ५० टक्के कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता …

Read More »

आणखी दोन स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मुंबईवरून येणाऱ्यांवर बंदी अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी काढले आदेश

मुंबई: प्रतिनिधी ज्या मुंबई शहरात मिळणाऱ्या रोजगाराच्या जीवावर मुंबईच्या आजूबाजूला शहरे वसली आता त्याच लहान-मोठ्या शहरांकडून उपनगरातून मुंबईमध्ये कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्याचे सत्र सुरु केले. काल कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांनी अशा आशयाचे पत्रक काढल्यानंतर आता अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी असे पत्रक काढत ८ मे पासून परतणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. …

Read More »

रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्टने त्यांच्या सुविधा आणि रूग्णालये आम्हाला द्या राज्यभरातील केंद्रीय संस्थांना मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करीत असून विविध उपाययोजना करीत या साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेगही लक्षणीयरीत्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य …

Read More »

मुंबईला १० हजारसाठी फक्त ५५ कमी तर महानगरचा ११ हजाराचा टप्पा पार राज्याची संख्या १५ हजार ५२५ + १४३ एकूण १५ हजार ६६७ वर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर एकट्या मुंबई शहरातील रूग्णांची संख्या ९ हजार ९४५ वर पोहोचली. तर मुंबई आणि ठाणे मंडळाची संख्या ११ हजार ७०४ वर पोहोचली आहे. राज्यात आज ८४१ नवे रूग्ण आढळून आले असून ही संख्या अशीच वाढत राहील्यास …

Read More »

दिलासादायक: एकाच दिवसात बरे होवून घरी जाणाऱ्यांचा विक्रम आरोग्ययंत्रणेच्या प्रयत्नांना यश

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवईकांनाही दिलासा आणि धीर मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात २२८ रुग्ण काल घरी गेले. …

Read More »

चक्क विरोधी पक्षनेते फडणवीसांना एनकांऊटरच्या धमक्या भाजपाकडून राज्यभरातल्या आयुक्तांना निवेदन

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात गेले काही दिवस कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असुन यासंबंधीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यभर पोलिस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. गेले काही दिवस राज्यांत माध्यमांची गळचेपी होत असून, समाज माध्यमांवर सरकार विरोधात व्यक्त होणाऱ्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. राज्याचे …

Read More »

मुंबईत गेलात तर कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात परतायचे नाही महानगरपालिकांकडून ८ मे पासून येण्या-जाण्यावर बंदी

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यातच आता कल्याण-डोंबिवली आणि उल्हास नगरातही बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईत कामानिमित्त जावून येणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय दोन्ही महापालिकांनी घेतला आहे. ही बंदी ८ मे पासून अंमलात आणण्यात येणार …

Read More »

जप्त केलेले मास्क, हँड सॅनिटायझर, पीपीई कीट्स रूग्णालयांना द्या काँग्रेस नेते मोहन जोशी यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे माहिती सादर करण्याचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी सरकारच्या विविध खात्यांनी जप्त केलेली पीपीई कीट्स वापरात आणण्यासाठी खुली करावीत याकरीता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर राज्य सरकारने याबाबत माहिती द्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.पी.कोलाबावाला यांच्या …

Read More »