Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

पवार म्हणाले, माज दाखविण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी केली; मराठी टक्का जावू देवू नका बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुमारंभ प्रसंगी पवारांनी मारली कौतुकाची थाप

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रावर संकटांवर संकट येत आहेत. मात्र संकटकाळात असतानाही विकासासाठीचा माज दाखविण्याची हिमंत मुख्यमंत्र्यांनी दाखविल्याचे कौतुकोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल काढत या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठीचा घेतलेला पुढाकाराचे सारे श्रेय त्यांचेच असल्याचे त्यांनी सांगितले. बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी …

Read More »

गडकरींचे कौतुक करत मुख्यमंत्री म्हणाले विकासासाठी नॅरोगेज ऐवजी ब्रॉडगेज असावा परस्पर सहकार्यातून राज्यातील रस्ते व लोहमार्ग आधुनिक तंत्रज्ञानाने मजबूत करु या

नागपूर : प्रतिनिधी राज्यात युतीची सत्ता असताना शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना बोलावून सांगितले की मुंबई, पुणे ही दोन शहरे सरळ रेषेत जोडली गेली पाहिजेत. जेणेकरून कमी वेळेत जाता आणि येता येईल. ते बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न नितीनजींनी सत्यात उतरविले. त्यांचे काम नेहमीच दैदिप्यमान असते असे कौतुकोद्गार काढत …

Read More »

सहकारी संस्थांना आता वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्यक्षही घेता येणार मात्र अट ही ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे

मुंबई : प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यावर निर्बंध आल्याने या संस्थांना आपले कामकाज चालविणे अवघड झाले होते. मात्र आता यावर राज्य सरकारने तोडगा काढत सहकारी संस्थांना या सभा घेण्यास परवानगी देत मार्गदर्शक तत्वे जाहीर जाहिर केली. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक …

Read More »

या १४ आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील १४ सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या असून कोशल्य विकासचे आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह यांची वर्णी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या सहसचिव पदी लावण्यात आली आहे. तर एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी मलीकनेर यांची मात्र आहे त्याच पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. तर कामगार विभाग आयुक्त कल्याण यांच्या …

Read More »

पॅकेज म्हणा नाही तर मदत त्यांचा प्रश्न, पण घोषणा करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

कोल्हापूरः प्रतिनिधी मी पॅकेज जाहिर करणारा नाही तर मदत जाहिर करणारा मुख्यमंत्री असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहिर केल्यानंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेत आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त तुम्ही त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत मिळण्याशी मतलब आहे, असा पलटवार विरोधी …

Read More »

पूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरा

मुंबई : प्रतिनिधी ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे  पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करत नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात …

Read More »

पर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी उपलब्ध होणार तारांकीत दर्जाच्या सोयी-सुविधा

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) पर्यटक निवासे आणि मोकळ्या जागा या निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय पर्यटनस्थळांच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी येत असलेल्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक व्यावसायिक, युवकांना रोजगार उत्पन्न होवून पर्यटनस्थळाचा सर्वागिण विकास व्हावा यासाठी एमटीडीसीने पुढाकार घेतला आहे. याठिकाणी पंचतारांकित दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार …

Read More »

आशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्य शासनाचा बहुमानच- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई : प्रतिनिधी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्य शासनाचा २०२१ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. …

Read More »

महानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय- यासह आणखी महत्वाचे निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील क व ड वर्ग महापालिका तसेच नगरपंचायती व नगर परिषदा यामधील कोविड कर्तव्य पार पाडतांना मरण पावलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. अ आणि ब वर्ग महानगरपालिका वगळता इतर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय १५ टक्के फि कमी होणार-शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी शाळांनी मनमानी पध्दतीने फि वाढवूनही त्यावर कोणतीही कारवाई करण्याऐवजी खाजगी शाळांना फक्त इशारे देण्याचे काम करणाऱ्या शालेय शिक्षण विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर १५ टक्के फि कमी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देत यासंदर्भात लवकरच शासन निर्णय जाहिर करण्यात …

Read More »