Breaking News

पॅकेज म्हणा नाही तर मदत त्यांचा प्रश्न, पण घोषणा करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

कोल्हापूरः प्रतिनिधी
मी पॅकेज जाहिर करणारा नाही तर मदत जाहिर करणारा मुख्यमंत्री असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहिर केल्यानंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेत आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त तुम्ही त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत मिळण्याशी मतलब आहे, असा पलटवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आज या पुराच्या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे २०१९च्या पुराचा अभ्यास करून त्याचा एक प्रस्ताव आम्ही जागतिक बँकेला पाठवला होता. इथलं पुराचं पाणी दुष्काळी भागाकडे कसं नेता येईल, यासाठी आम्ही केंद्रीय विभागाची देखील मदत घेतली होती. दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्याची माहिती काढली होती. हे पुराचं पाणी दुष्काळी भागाकडे वळवता येते. २५ नोव्हेंबरला आम्ही ३५०० कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. जागतिक बँकेच्या टीमने त्याला तत्वत: मान्यता दिली होती. आता तो प्रस्ताव पुढे नेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावलं आहे. त्यावेळी आम्ही या सूचना मांडूच. पण पुरावर हाच दीर्घकालीन उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
बॅकवॉटरमुळेच लोकांना संकटाचा सामना करावा लागतो. त्यावर काम करण्याची विनंती आम्ही सरकारला करणार आहोत. त्यासोबतच तात्काळ मदत करणं गरजेचं असून तशी मागणी करणार असल्याचे सांगत नुकसान झाल्यानंतर तातडीची मदत राज्य सरकारकडून यायला हवी होती. ती अद्याप आलेली नाही. नागरिक सातत्याने २०१९च्या मदतीचा उल्लेख करत होते. तेव्हा रोखीनं तात्काळ मदत करण्यात आली होती. एखादी आपत्ती आल्यानंतर त्यानंतरचा महत्त्वाचा काळ असतो, ज्यात तातडीची कामं करावी लागतात. घरांमध्ये, दुकानांमध्ये चिखल घुसतो, सर्व वस्तू ओल्या झाल्या असतात. अंतर्वस्त्रापासून सर्व गोष्टी लोकांना आणाव्या लागतात. अशा परिस्थितीत ही तातडीची मदत आवश्यक असते. त्या कुटुंबाकडे तेवढेही पैसे नसतात. सरकारने अद्याप ती मदत दिलेली नाहीत. उशीर झाला आहे. पण आता तरी सरकारने ती मदत करावी, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

भाजपा आमदार जयकुमार गोरे अखेर न्यायालयात शरण मृत व्यक्तीला जीवंत असल्याचे दाखवित जमिन खरेदीची खोटी कागदपत्रे तयार केल्याचे प्रकरण

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणी गावातील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याप्रकरणी …

Leave a Reply

Your email address will not be published.