Breaking News

Tag Archives: cm fadnavis

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावा काँग्रेसची लोकायुक्तांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ताडदेव, मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतला. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती. पण अद्याप या प्रकऱणी निकाल आला नाही. तो तात्काळ द्यावा अशी …

Read More »

आझाद मैदानात वर्षभरात ६३८ आंदोलनात अडीच लाख आंदोलनकर्ते सहभागी दरदिवशी होतात सरासरी २ आंदोलने तर ७०४ आंदोलक असतात

मुंबई: प्रतिनिधी सरकारी दरबारी विविध मागण्यांची तड लावण्यासाठी मुंबईतील सीएसएमटी येथील आझाद मैदानावर राज्यातील तमाम सामाजिक संघटना, राजकिय पक्ष आंदोलनासाठी जमा होतात. या मैदानावर मागील वर्षी अर्थात २०१८ साली राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, कामगार संघटन, ख्रिश्चन, बंजारा आणि अन्य समाजाबरोबर व्यापारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा, उपोषण आणि …

Read More »

मागास जिल्ह्यांच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

अकोला-चिखली: प्रतिनिधी यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी या जिल्ह्यांना कायम मागास ठेवले आणि त्यामुळे या जिल्ह्यांच्या विकासाकडे अतिशय गांभीर्याने आम्ही लक्ष देत आहोत आणि या दोन्ही जिल्ह्यात अनेक प्रकल्पांसाठी भरीव निधी दिला जात असल्याचे सांगत मागास जिल्ह्यांच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार …

Read More »

उमेदवारही भाड्याने आणावे लागणा-यांनी उपदेश देऊ नये १५ लाख, दीडपट हमीभाव, दरवर्षी दोन कोटी कोटी नोकऱ्यांचे काय ते सांगा? अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाला नांदेडात माझ्या विरोधात सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांना भाड्याने उमेदवार आणावा लागला. त्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना नांदेडकरांना उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही. नांदेडचा विकास कोणी केला? हे नांदेडच्या जनतेला माहित आहे. नांदेडकरांनी महापालिका निवडणुकीतही या भाड्याच्या नेतृत्वाचा दारूण पराभव केला आहे. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीतही …

Read More »

रताळ्याला म्हणतंय केळं आणि दुसर्‍याच्याच लग्नात नाचतंय खुळं! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अशोक चव्हाण आणि राज ठाकरेंना टोला

नांदेड: प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक इतकी कठीण होते आहे की, त्यांना आता आपल्या प्रचारासाठी नेते आणि पक्षही किरायाने आणावे लागत आहेत, अशी जोरदार टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोकर, नांदेड येथे केली आणि हे पक्ष आणि नेते आहेत तरी कोण तर ‘जे रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या …

Read More »

पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे उमेदवारी अर्ज मागे मात्र कपिल पाटलांना विरोध कायम - सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे

भिवंडीः प्रतिनिधी भिवंडी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे बाळ्यामामा यांनी बंडखोरी करत भरलेला उमेदवारी अर्ज शुक्रवारी अखेर मागे घेतला . शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे भिवंडी लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात शिवसेना पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानता सुरेश ( बाळ्या मामा ) म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष …

Read More »

विषप्रयोग करणा-या युनायटेड फॉस्फरस कंपनीशी भाजपची भागीदारी देवनार डंपिंग ग्राऊंडमधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारातः काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी

मुंबईः प्रतिनिधी बोगस कीटकनाशके तयार करून विदर्भात ४० शेतक-यांच्या मृत्यूस आणि शेकडो शेतक-यांच्या विषबाधेस कारणीभूत असलेल्या युनायटेड फॉस्फरस लिमीटेड कंपनीशी भाजपची भागीदारी असल्यानेच या कंपनीच्या कार्यालयात भाजपचे प्रचार साहित्य निर्मिती सुरु होती. तसेच देवनार डंपींग ग्राऊंड मधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी वापरला जात असल्याचा आरोप करून या संपूर्ण प्रकाराची सीबीआय …

Read More »

मतदारांना भुलविण्यासाठी राज्य सरकारची अशीही चलाखी दुष्काळ, खरीप आणि गृहनिर्माण योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या कामाला गती

मुंबईः प्रतिनिधी निवडणूका आल्या की त्या जिंकण्यासाठी सत्ताधारी, विरोधकांकडून मतदारांना भुलविण्यासाठी कोणती ना कोणती लोकानुनयी घोषणा केली जाते. मात्र निवडणूका जिंकण्यासाठी राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारने थेट सरकारी निधीचाच वापर करत मागील दोन वर्षापासून रखडलेल्या शेतकऱ्यांना द्यावयाची नुकसान भरपाईचा निधी आणि शहरी भागातील नागरीकांच्या गृहनिर्माण प्रकल्पांना निधी पुरविण्याच्या हालचालींना मोठ्या प्रमाणावर वेग …

Read More »

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या विरोधकांच्या राष्ट्रवादाबद्दलच प्रश्नचिन्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला

मुंबईः प्रतिनिधी देशात राष्ट्राभिमान जागा झाला असताना पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरून प्रश्न उपस्थित करणारे विरोधक पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत. अशा विरोधकांच्या राष्ट्रवादाबद्दलच आता प्रश्न निर्माण होतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार, मुंबईचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा आणि अहमदनगरचे …

Read More »

मित्र पक्षांनी कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढवावी मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत

मुंबईः प्रतिनिधी भाजप मित्रपक्षांच्या पदरात लोकसभेची जागा पडणार नसून बारामतीत ही कमळ चिन्हांवरच निवडणूक लढवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत युतीच्या महाआघाडीतील मित्रपक्षांना स्वतंत्र जागा देणार नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मीडिया रूम चे उदघाटन झाले यावेळी ते …

Read More »