Breaking News

Tag Archives: bjp

विनायक राऊत म्हणाले, नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा, सगळं सत्य समोर येईल रमेश गोवेकर, सत्यजित भिसे, बाळा यांच्या हत्या प्रकरणांचे सत्य समोर आणायचं असेल तर

राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा विरूद्ध शिवसेना आणि आता भाजपा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात एकमेकांच्या विरोधातील कुरघोड्या संपता संपत नाहीत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सतत झडत असतात. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, आता रमेश …

Read More »

मालेगांव स्फोटप्रकरणी न्यायालयाने प्रसाद पुरोहितांची याचिका फेटाळली लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावरील गुन्हे रद्दबातल करण्यास नकार

२००८ साली मालेगांव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यात लेफ्ट.कर्नल प्रसाद पुरोहित यांचा सहभाग असल्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणि नंतर एनआयएने अटक केली. तसेच याप्रकरणी पुरोहित यांने बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना प्रशिक्षण दिल्याचा आणि अनेकांच्या गाठीभेटी घेतल्याची माहिती पुढे आली होती. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर प्रसाद पुरोहित यांना जामिन मिळाला. त्यानंतर आपल्यावरील आरोप …

Read More »

नार-पार-गिरणा योजनेच्या सर्व मान्यता दोन महिन्यात देण्याची कार्यवाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

“नार-पार-गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती कडे पाठविण्यात आला असून येत्या दोन महिन्यात या संदर्भातील सर्व मान्यता मिळवून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्यास मान्यता देण्यात येईल”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

नैना क्षेत्रातील विकास नियंत्रण नियमावलीत बदलाबाबत लवकरच प्रस्ताव उद्योग मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरीता (नैना) लागू असलेल्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा प्रस्ताव सिडकोने राज्य शासनास मंजूरीकरीता सादर केला असून, यामध्ये धोकादायक तथा मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची तरतूद अंतर्भूत करण्याचे प्रस्तावित आहे. यावर नगररचना संचालकांचे अभिप्राय मागविण्यात आले असून ते प्राप्त होताच लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात …

Read More »

अध्यक्षांवरील विरोधकांचा अविश्वासाचा ठरावः अजित पवार म्हणाले, माहिती नाही काँग्रेससह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी अविश्वास ठराव दाखल केल्याची चर्चा

नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे सातत्याने विरोधी बाकावरील सदस्यांना बोलू देत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी विधानसभाध्यक्षांना उद्देशून तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका असा इशारा दिला. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर विधानसभेने निलंबनाची कारवाई केली. मात्र शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या काही आमदारांनी थेट …

Read More »

मोदींना मातृशोक, अंत्यसंस्कारानंतर पंतप्रधानांची लगेच कामाला सुरुवात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कोलकत्त्यातील वंदे भारतला दाखविला हिरवा झेडा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. मृत्यूसमयी हिराबेन मोदी या १०० वर्षाच्या होत्या. पंतप्रधान मोदींना मातृशोक झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर अनेकांनी …

Read More »

देवेंद्र फडणवीसांची घोषणा, विदर्भ- मराठवाड्यातील उद्योगांसाठी नवे ऊर्जा धोरण विरोधकांच्या प्रस्तावावर फडणवीसांचे उत्तर

विरोधकांनी विधानसभेत २९३ अन्वये मराठवाडा-विदर्भातील अनुशेष भरतीच्या अनुशंगाने काल दुपारपासून चर्चा करण्यात येत होती. त्या प्रस्तावाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना विदर्भ आणि मराटवाड्यातील उद्योगांसाठी विशेष ऊर्जा धोरण करण्यात येत असल्याची घोषणा केली. विदर्भ मराठवाडा भागातील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दादा आमच्यात भांडणे लावू नका, माझे नीट लक्ष आहे अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रत्युत्तर

विरोधकांनी विधानसभेत विदर्भ-मराठवाडाच्या विकासासाठी मांडलेल्या २९३ च्या प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून प्रत्युत्तर दिले. त्यानंतर राईट टू रिप्लाय अंतर्गत प्रश्न विचारताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांच्या चिमट्याला …

Read More »

अजित पवार यांचा आरोप, गायरान जमीनप्रकरणात सत्तारांनी एजंटामार्फत पैसे घेतले चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या

तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीने वाटप केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली. तसेच मंत्री सत्तार यांनी गायरान जमिन …

Read More »

गिरिष महाजन म्हणाले, खरं तर बोगस डॉक्टरांना आपणच अलाऊन्स देतोय फक्त त्यांना दररोज पाचशेचा दंड ठोठावतो, कायदा बदल्याची आवश्यकता

मागील काही वर्षांमध्ये राज्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढत आहे. यासंदर्भातील प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बन्सोड यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरिष महाजन म्हणाले, खरे तर आपण बोगस डॉक्टरांना आपणच अलॉऊन्स देतोय असे सांगत या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या एका निर्णयामुळे असल्याचे स्पष्टीकरण दिले. विधानसभेचे …

Read More »