Breaking News

Tag Archives: ajit pawar

राष्ट्रवादीची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; ‘या’ नेत्यांचा झाला समावेश महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यकारिणीवर अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुप्रियाताई सुळे...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार तर उपाध्यक्षपदी खासदार प्रफुल पटेल आणि मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे यांची निवड जाहीर झाली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याने पक्षातील मुख्य जनरल सेक्रेटरी पदी खासदार सुनिल तटकरे यांची …

Read More »

अजित पवार म्हणाले, …मंत्रिमंडळ उपसमितीच गुंडाळली

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात राज्यातील एकनाथ शिंदे सरकारकडून दाखविण्यात येत असलेल्या बेफिकीरी, अनास्थेबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेली मंत्रिमंडळाची उपसमिती शिंदे सरकारने बरखास्त केली, त्यानंतर नवीन …

Read More »

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राला आर्थिक मागास बनविण्यासाठीच प्रकल्प गुजरातला राज्यसरकारने तात्काळ हस्तक्षेप करुन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा;विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र राज्यासाठी महत्वपूर्ण असणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प तळेगाव एमआयडीसीत साकारण्यात येणार होता. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले होते, त्यादृष्टीने सर्व पुर्तता करण्यात आली होती. मात्र दोन लाख कोटींची गुंतवणुक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा महत्वपूर्ण प्रकल्प गुजरातमध्ये …

Read More »

दिल्लीतील नाट्यावर अजित पवार म्हणाले,… त्यामुळे मी बोलणं टाळलं गर्दी जमवण्यासाठी ही वेळ मुख्यमंत्र्यांवर आली असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे...

पैठण येथील सभेला गर्दी जमवण्याकरीता अंगणवाडी सेविकांना, मदतनीस, पर्यवेक्षिकांना उपस्थित राहण्याचे पत्र काढावे लागते ही वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. पैठण येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेला येण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने अंगणवाडीसेविका, मदतनीस …

Read More »

अजित पवार यांनी दिला इशारा, …तर दुध उत्पादनाचा प्रश्न गंभीर पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी ;पशुधनाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये...

देशातील राजस्थान, पंजाब, हरयाणासारख्या राज्यानंतर महाराष्ट्रातील पशुधनालाही विषाणूजन्य लंपी त्वचारोगाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत राज्यातल्या १७ जिल्ह्यातल्या ५९ तालुक्यात हजारो जनावरे लंपी आजाराने ग्रस्त असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पशुधनांमधील लंपीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दुधउत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा. लंपीग्रस्त …

Read More »

रामदास कदम म्हणाले, तर ८-१० वर्षात शिवसेनेचं काही शिल्लक राहीलं नसतं अजित पवार यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांचे वक्तव्य

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित …

Read More »

अजित पवार म्हणाले; …एकदम ओक्केच झालं, आता काय बोलायचं श्रीगोंद्यात एकनाथ शिंदेच्या बंडखोरीवरून केले वक्तव्य

राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात. परिस्थिती कोणतीही असो त्यावर परखडपणे भाष्य करण्यात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. तसेच परिस्थितीच्या अनुषंगाने वास्तवादी चित्र मांडत हास्यविनोद करण्यातही त्यांचा हातखंडा आहे. अनेकदा भाषणात किंवा माध्यमांसमोर त्यांनी लगावलेले टोले …

Read More »

ठाकरे-पवार यांचा सरकारी तर फडणवीसांचा बिगर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर भर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाजगी कर्मचारी, तर एकनाथ शिंदेकडे खाजगी व्यक्तींचा भरणा कमी

साधारणत: अडीच वर्षापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर सांसदीय राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे विराजमान झाले. मात्र त्यांच्या कारकिर्दीतील अडीच वर्षापैकी शेवटच्या दिड वर्षात फक्त एका बिगर सरकारी व्यक्तीची खाजगी सचिव म्हणून नियुक्ती केली. मात्र त्यासही प्रशासनाकडून मंजूरी मिळाली नाही. तरीही त्यांनी शेवटपर्यत सरकारी यंत्रणा आणि त्या यंत्रणेतील …

Read More »

आता कॅगकडूनही महाविकास आघाडी सरकारच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक कोरोनाकाळात केलेल्या कामाचे आणि आर्थिक शिस्तीचे 'कॅग' अहवालात नोंद

कोरोना काळात सर्व कामकाज ठप्प असताना आणि राज्याच्या तिजोरीत एक छदाम पैशाचे इन्कम नसताना तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक दस्तुरखुद्द कॅगने केले. राज्यात सत्तांतर होवून नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या दृष्टीने मोठा सेटबॅक मानण्यात येत आहे. …

Read More »

अजित पवार यांचा आरोप, रेशनिंग व्यवस्थेतून गरीबांना बाहेर काढण्याचे षढयंत्र शासनाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून हे प्रकार थांबवावे

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांकडून सक्तीने आणि फसवून ‘सबसीडी’ सोडून देण्याचे अर्ज भरुन घेण्याचे काम अनेक रेशन दुकानातून सुरु आहे. त्यामुळे अनेक गरजू, गरीब लाभार्थी अंत्योदय योजनेपासून वंचित राहणार आहेत, त्यामुळे शासनाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करत हे प्रकार थांबविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार …

Read More »