Breaking News

Tag Archives: ajit pawar

देवेंद्र फडणवीसांची मागणी उपमुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोरोना काळासाठी मिळणार अतिरिक्त भत्ता

मुंबई : प्रतिनिधी मुंबई, पुण्याप्रमाणेच आता राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज त्यासाठी एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली. आभासी पद्धतीने झालेल्या या …

Read More »

सरकारचा मोठा निर्णयः सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोना उपचाराची बीले शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा समावेश

मुंबई: प्रतिनिधी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य शासनाने घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसेच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते. राज्य शासनाने …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबरः मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा मंत्री वर्षा गायकवाड यांची ट्विटरद्वारे माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सरकारी सेवेत असलेल्या मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून २०१७ सालापासून रखडलेल्या या पदोन्नत्या लवकरच मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली. मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नत्याबाबत निर्णय घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची स्थापना करण्यात आली होती. या मंत्रिगटाची उपमुख्यमंत्री …

Read More »

मुनगंटीवारांच्या प्रश्नावर अजित पवारांचे हे सूचक वक्तव्य मराठवाडा- विदर्भ वैधानिक महामंडळ करू मात्र वरिष्ठांची जबाबदारी घ्या

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे महत्वाचे वैधानिक विकास महामंडळ असलेल्या मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची मुदत संपलेली असून ते महामंडळ पुन्हा कधी तयार करणार अशी विचारणा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी करत कोण आहे तो झारीतील शुक्राचार्य जो प्रस्ताव रोखत असल्याचा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांना उपप्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यावर आम्ही महामंडळ …

Read More »

अवरेज वीज बीलाची फडणवीसांची तक्रार, विधानसभाध्यक्षांचे तातडीने आदेश पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी आदेश दिले

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्तास्थानी विराजमान झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमावेळी एक पुस्तिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते पुस्तिका प्रसिध्द केली. त्या पुस्तकात मुख्यमंत्री लिहितात कि, वर्षभरात सर्व मंत्र्यांनी एकदिलाने एक संवादाने निर्णय घेण्यास सहकार्य केले. मात्र वीज बील सवलतीच्या घोषणेबाबत विसंवाद का असा सवाल उपस्थित करत ज्यांचे घर पुरात …

Read More »

शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ६ हजार कोटींची तरतूद : वाचा कसे केले निधीचे वाटप २२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेच्या पटलावर

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विविध विभागाच्या खर्चासाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ५ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. यापैकी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रूपये प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी २ हजार ८५० कोटी रूपयांची तर अतिवृष्टीमुळे आणि पूरबाधितांसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी २ हजार २११ …

Read More »

फडणवीसांची पत्रकार परिषद, जोश नसलेली आणि पडलेल्या चेहऱ्याची होती अजित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

मुंबई : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद पाहिली. मात्र त्यात कोणत्याही प्रकारचा जोश नव्हता. तेथे उपस्थित असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही चेहरा पडलेला आणि डिमोरलाईज झालेले दिसत होता अशी उपरोधिक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत भाजपा नेते फडणवीसांचे आरोप म्हणजे …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अघोषित आणि केंद्राची काय घोषित आणीबाणी ? फडणवीसांना खोचक प्रतित्तुर ; मांडण्यात येणारे अध्यादेश आणि विधेयकांची यादी

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकार त्यांच्याशी चर्चा करायला जात नाही. उलट या कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारत आहेत. तेथील परिस्थिती जावून पाहण्यापेक्षा राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मग केंद्राने काय घोषित आणीबाणी सुरु …

Read More »

कृषी विधेयक फायद्याचे असते तर शेतकरी रस्त्यावर उतरला नसता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपाला टोला

मुंबई : प्रतिनिधी शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. जर कृषी विधेयक शेतकर्‍यांच्या फायद्याचं आहे असं केंद्र सरकार बोलत असेल तर शेतकरी या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. जनता दरबारासाठी उपमुख्यमंत्री …

Read More »

राज्य सरकारने दिली शरद पवारांना आगळीवेगळी वाढदिवासाची भेट या योजनेला दिले पवारांचे नाव

मुंबईः प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस असून या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नावे योजना सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक …

Read More »