Breaking News

Tag Archives: ad.prakash ambedkar

शेवटी एल्गार मोर्चा निघालाच ! जिजामाता उद्यानापासून मोर्चा निघाला आझाद मैदानाकडे

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आंबेडकरी बांधवांनी काढलेल्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र तरीही वेळीच माहिती पोहोचली नाही. त्यामुळे हजारो कार्यकर्त्ये जिजामाता उद्यानाजवळ पोहोचले आणि तेथूनच या दलित समाजाने मोर्चाला सुरुवात केली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाच्या दिशेने जाण्यास सुरुवात …

Read More »

भिडेमुळे सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आहे का ? विधान परिषदेत धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाला. मात्र दुसरा आरोपी संभाजी भिडे याला अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला. संभाजी भिडेला अटक होत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघणार आहेत. संभाजी भिडे …

Read More »

संभाजी भिडेवरून संभाजी ब्रिगेडमध्ये फूट ? प्रवीण गायकवाड नव्या ब्रिगेडचे अध्यक्ष

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगांव हिंसाचारप्रकरणी अँट्रोसिटी गुन्हा दाखल असलेले संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अँड. प्रकाश आंबेडकर यांनी एल्गार मोर्चा काढला. मात्र संभाजी ब्रिगेडमध्येच संभाजी भिडे यांना माननारा मोठा वर्ग असल्याने एल्गार मोर्चास पाठिंबा देण्यास या वर्गाकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. तर काहीजणांनी एल्गार मोर्चाला पाठिंबा दिल्याने शेकापमध्ये …

Read More »

एल्गार मोर्चाचे विधानसभेत पडसाद भिडेला पाठीशी घालत असल्याचा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगांव प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांची नावे एफआयआर मध्ये आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे याला अटक करण्यास अडीच महिने लागतात. तर संभाजी भिडे सगळीकडे फिरत असून पत्रकार परिषदा घेवून वावरतो. मात्र राज्य सरकारला तो सापडत नाही. यावरून राज्य सरकार भिडे यास पाठीशी घालत असल्याचे …

Read More »

एल्गार मोर्चाला संभाजी ब्रिगेडचा पाठींबा पूर्ण ताकदीनिशी मोर्चात सहभागी होणार

पुणे : प्रतिनिधी भिमा कोरेगांव येथील दलित समाजावर झालेल्या हल्ल्याच्या पाठीमागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हेच आहेत. संभाजी भिडे यास अटक करण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी २६ मार्च रोजी काढण्यात येत असलेल्या एल्गार मोर्चास संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा देत यात सहभागी होणार असल्याची माहिती संभाजी …

Read More »

पोलिस म्हणतात भिडेंच्या अटकेसाठी एल्गार मोर्चा नको, तर आंदोलन करा पोलिसांनी परवानगी नाकारल्याची अँड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगांव येथे विजयी स्तंभास मानवंदना देण्यासाठी गेलेल्या दलितांवर काही समाजकंटकांनी हल्ल्या केल्याच्या घटनेतील मुख्य सुत्रधार असलेल्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी दलित समाजाच्या विविध संघटनांकडून एल्गार मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र त्या मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारत मोर्चा नाही तर आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी …

Read More »

भीमा कोरेगांव प्रकरणी मुख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारची विनंती फेटाळली आमच्याकडे न्यायाधीशांची संख्या कमी असल्याने निवृत्त न्यायाधीश नियुक्ती करा

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगांव येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. यासाठी एखाद्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची मागणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केली. मात्र आमच्याचकडे न्यायाधीशांची कमतरता असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने राज्य सरकारची विनंती …

Read More »