Breaking News

Tag Archives: प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर म्हणाले, बैठकीला नाही तर शरद पवार यांनी चर्चेला बोलावलंय

देशातील विरोधकांची इंडिया आघाडी लोकसभा निवडणूकीपूर्वीच फाटाफुटीच्या उंबरठ्यावर पोहोचली. परंतु तरीही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार वगळता इतर सहभागी पक्षांशी काँग्रेसने यशस्वीरित्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु ठेवल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीती घटक पक्षांनी अद्याप काँग्रेस आणि शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील चर्चा अद्यापही प्राथमिकस्तरावर …

Read More »

प्रकाश आंबेडकर का म्हणाले? मविआच्या बैठकांना जाऊ नका

राज्यातील राष्ट्रीय आणि प्रादेशिकस्तरावरील राजकिय पक्षांसोबतच्या आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर कधी अडकून नाहीत. परंतु प्रत्येक निवडणूकीत त्यांनी नेहमीच स्वतःचे अस्तित्व दाखवून दिल्याचे दिसून आले आहे. काल संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील लोकसभा मतदारसंघातील जाहिर सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आणि महाविकास आघाडी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा मोदींना इशारा, आम्ही १५० च्या वर जाऊ देणार नाही

राजकीय दृष्टिकोनातून आज आपण पाहिलं की, जो ओबीसी, धनगर, साळी, माळी, लोहार, सोनार इत्यादी जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे जागृत झाला. त्याच्या हक्काची आणि अधिकाराची त्याला जाणीव झाली. आज तो स्वतःच्या अधिकारांची सुरक्षा करायला निघाला आहे. म्हणून महाविकास आघाडीला सांगितलं की, जर आपली युती झाली, तर त्यामध्ये किमान १५ उमेदवार हे ओबीसींचे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा विश्वास, स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या ६ जागा जिंकू

आम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान ६ लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही ४२ मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत, त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले …

Read More »

वंचितचा मविआला नवा प्रस्ताव २७ ठिकाणी तयारी, मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी?

राज्यात आणि देशात भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा गटाच्या महाविकास आघाडीत सहभागी झाले. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडातील जागा वाटपाच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना नवा प्रस्ताव दिला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, जयंत पाटील यांचा फोन आला होता…त्यांना सांगितले

महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आहे. या बैठकीत जाण्यासाठी प्रकाश आंबेडकर देखील तयार आहे. मात्र, २७ तारखेला पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे बैठकीला जाणं शक्य नसल्याचं त्यांनी एक्सवरुन माध्यमांना सांगितले आहे. तसेच, …

Read More »

भाजपाच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा उपरोधिक टोला, आधी तुमचा पक्ष शिल्लक….

आगामी लोकसभा निवडणूकांचे वारे सध्या देशात जोरात वाहु लागले आहे. त्यातच भाजपाकडून ४०० पारचा नारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर नुकतेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना आवाहन करत जिल्हास्तरावरील छोटे पदाधिकारी- पक्षांना भाजपात सामावून घेत संपवून टाका. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आवाहनावर शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उपरोधिक टोला …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा

काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेना (ठाकरे गट) यांना आम्ही विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या पक्षाचा मसुदा आम्हाला दाखवावा. ज्यामुळे एकमेकांना कळतं की, आपण कोणत्या मुद्द्यावर एकत्र आहोत आणि कोणत्या मुद्द्यावर एकत्र नाहीत, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत मागणी केली. प्रकाश …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, बहुसंख्य हिंदू तर धार्मिक राजकारण कशासाठी?

राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनेही आता मराठवाडा, विदर्भात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका आणि सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच आज वर्धा येथील वंचितच्या जाहिर सभेसाठी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी संध्याकाळी सभेत पक्षाची भूमिका मांडण्याआधी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा जरांगेंना सल्ला, मराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभेत मांडा

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा ६ वा दिवस असून त्यांची प्रकृती अस्वस्थ होत आहे. तसेच डॉक्टरांकडून उपचार घेण्यासही नकार दिला आहे. त्यातच राज्यात ओबीसी विरूध्द मराठा असे चित्र सध्या सामाजिक आणि राजकिय स्तरावर दिसू …

Read More »