Breaking News

Special Trains : मध्य रेल्वेच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर-मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर चार विशेष गाड्या नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२३ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर या ४ एकेरी विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालवणार आहे

मुंबई, 19 ऑक्टोबर : मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस २०२३ साठी नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर ४ विशेष गाड्या ( Special Trains ) चालवणार आहे.

नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२३ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर या ४ एकेरी विशेष गाड्या ( Special Trains ) विशेष शुल्कासह चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे-

१) नागपूर – मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे स्पेशल २० (ICF) कोच

01018 वन वे स्पेशल नागपूर येथून दि. २४.१०.२०२३ (मंगळवार) रोजी २०.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.

थांबे: नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस.

संरचना: ५ द्वितीय आसनश्रेणी, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह १५ सामान्य द्वितीय श्रेणी (एकूण = २० ICF कोच).

२) नागपूर- पुणे वन वे स्पेशल २४ (ICF) कोच

01030 एकेरी विशेष गाडी दि. २४.१०.२०२३ (मंगळवार) रोजी नागपूर येथून २३.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १७.४५ वाजता पोहोचेल.

थांबे: नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड मार्ग आणि पुणे

संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणीसह २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन (एकूण = २४ ICF कोच)

३) नागपूर – मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे स्पेशल २४ (ICF) कोच

01032 एकेरी विशेष गाडी  ( Special Trains ) दि. २५.१०.२०२३ (बुधवार) रोजी नागपूर येथून १५.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०८.१५ वाजता पोहोचेल.

थांबे: नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस.

संरचना: २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह २४ सामान्य द्वितीय श्रेणी (एकूण = २४ ICF कोच).

४) सोलापूर – नागपूर वन वे स्पेशल २४ (ICF) कोच

01029 एकेरी सुपरफास्ट स्पेशल दि. २४.१०.२०२३ (मंगळवार) रोजी २०.२० वाजता सोलापूर येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १३.०५ वाजता पोहोचेल.

थांबे: सोलापूर, कुरुडवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा आणि नागपूर

संरचना: २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह २४ सामान्य द्वितीय श्रेणी (एकूण २४ ICF कोच).

आरक्षित डब्यांचे तिकीट बुकिंग दि. २०.१०.२०२३ (शुक्रवार) पासून सुरू होईल.

प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी आणि सुविधेचा लाभ घ्यावा.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *