Breaking News

सेक्सटॉर्शन प्रकरणाच्या मुंबईत वाढल्या घटना, कशी घ्याल खबरदारी? समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करताना या गोष्टी ठेवा लक्षात

सेक्सटॉर्शन, आक्षेपार्ह मजकूर, अश्लीलता, मॉर्फिंग याचे प्रमाण मुंबईत प्रचंड वाढले आहे. मुंबईत आत्तापर्यंत बदनामीच्या भीतीने दोन आत्महत्या झाल्या आहेत प्रकरण बोटीने समोर आलेले नाहीये. मुंबईत सेक्सटॉर्शनचे चालू वर्षात आत्तापर्यंत ४९ गुन्हे दाखल झाले. दिवसागणिक ही संख्या वाढत आहे. त्यामुळे सायबर जगतात वावरताना सावधगिरी महत्त्वाची असल्याचे सायबर पोलिसांनी म्हटले आहे.

असे करतात सेक्सटॉर्शन

समाजमाध्यमांवर मैत्रीण भासविणाऱ्या अनोळखी महिला ‘हाय, हॅलो’ने सुरुवात करते. त्यांनतर संदेशाला प्रतिसाद मिळाल्यास मोबाइल क्रमांकाची मागणी करतात . प्रातां संभाषण करून मन जिंकून अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल केला जातो तसेच समोरच्या व्यक्तीलाही असे करण्यास प्रवृत्त केले जाते. अश्लील संभाषण आणि व्हिडीओ ॲपच्या साहाय्याने एकत्र केले जातात त्यानंतर सदर व्यक्तील समाजमाध्यमांवर, यूट्युबवर अपलोड करण्याची धमकी दिली जाते तसेच व्हायरल करण्याची भीती दाखवून पैसे उकळतात

हे नेहमी लक्षात ठेवा

समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करताना जपून करा तसेच तुमचे खासगी फोटो कुणालाही शेअर करू नका. अनोळखी व्यक्तीने केलेले ‘व्हिडीओ कॉल’ स्वीकारू नका. पुरुषांना आकर्षित करण्यासाठी तरुणींच्या चेहऱ्याचा वापर केला जातो. एखादा ‘न्यूड कॉल’ चुकून स्वीकारला तर अधिक काळ बोलू नका. तसेच लैंगिक छळाचा आरोप, बदनामीची भीती दाखवून पैशांची मागणी करतील मात्र बदनामीच्या भीतीने खचू नका, फोटो मॉर्फिंग आहे हे लक्षात असू द्या.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *