Breaking News

मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर, घराणेशाहीवर घरदांज माणसाने…

एकदिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काळाराम मंदिरात विधीवत पुजा केली. तसेच नाशिक येथील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्धाटन करत देशातील राजकिय घराणेशाहीवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवयुवकांनी जास्तीत जास्त राजकारणात यावे असे आवाहन तरूणाईला केले. त्यावर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत घराणेशाहीवर घरंदाज व्यक्तीनं बोललं बर असे सांगत खोचक शब्दात मोदींवर पलटवार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आज सकाळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कल्याण डोंबिवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील असे वाटत होते. परंतु ते बोलले नाहीत. त्यांना गद्दारांची घराणेशाही चालते का? असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावत गद्दार लोकप्रिय म्हणून त्यांची घराणेशाही प्राणप्रिय असा खोचक टोलाही नरेंद्र मोदी यांना लगावला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे टीका करताना म्हणाले की, हा सगळा बोगसपणा सध्या सुरू आहे. घराणेशाहीवर एखाद्या घरंदाज माणसानं बोललं तर चांगलं असे सांगत नुकतेच नवी मुंबईतील एमटीएचएल शिवडी-न्हावा शेवा प्रकल्पाचे उद्घाटन केलं. मात्र या प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देत अटल सेतू अशी घोषणाही करण्यात आली. परंतु संपूर्ण कार्यक्रामात अटलबिहारी वाटपेयी यांचा फोटोच नव्हता असा उल्लेख करत आताही अयोध्येतील राम मंदिरात रामाची मुर्ती असेल की नाही याच्याबद्दल चिंता वाटते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील राम मंदिरात स्वतःची नव्हे तर रामाची मुर्ती लावावी असा खोचक टोलाही नरेंद्र मोदी यांना लगावला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, झेंडे लावायला अनेकजण पुढे येतात. पण लढाईच्यावेळी कुठे गायब होतात अशी टीका भाजपाच्या नेत्यांवर करत बाबरी मस्जिदीच्या घुमटावर जर त्यावेळी कारसेवक चढले नसते तर आजचे राम मंदिर तरी उभे राहिले नसते अशी खोचक टीका करत राम मंदिराचा मुद्दा थंड बस्त्यात पडल्यानंतर शिवसेनेनच घोषणा दिले होती पहिले मंदिर फिर सरकार त्यानंतर स्वतः तिथे गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत निकाल दिल्याची आठवण सांगत पंतप्रधान मोदी यांनी टोला लगावला.

Check Also

पंतप्रधान मोदी यांचा आरोप, ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कट

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले आणि ओबीसी समाजाचे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *