एकाबाजूला भारत विकासाच्या वाटेने चालल्याचे वक्तव्य करत सांसदीय कारभारातही हिंदूत्ववादी विचारसरणीला आणि प्रथांना प्राधान्य देत केवळ स्वतःच्या नावाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच दिल्लीतील नवे संसद भवन असेल, शहिद स्मारक किंवा राजपथाचे कर्तव्यपथ असे नामकरण करण्याचा कार्यक्रम असेल अशा महत्वाच्या कार्यक्रमाला सातत्याने भारताच्या प्रशासनाचे घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना सातत्याने बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी शिवसेनेच्या वतीने नाशिक येथील काळाराम मंदिरात आयोजित महापूजेसाठी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना आमंत्रण देत भाजपाच्या राजकारणावर थेट कुरघोडी केली.
काल शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आणि नवी मुंबईतील बहुचर्चित एमटीएचएल प्रकल्पाचे लोकार्पणासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी आतापर्यंत काळामंदिरातील महंत, पुजाऱ्यांकडून हिंदूधर्मातील चुकीच्या प्रथांचे पालन करत माजी खासदार संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांना महिला असल्याने पुजा करण्याचा मान नाकारला होता. त्यावर आजपर्यंत कधीच भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच भाष्य केले नाही. तसेच शिवसेना उबाठा गटाने २५ वर्षाची राजकिय मंत्रीला सोडचिठ्ठी देत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती करत भाजपाशिवाय राज्याचे मुख्यमंत्री पद शिवसेनेने सांभाळले.
या राजकिय घडामोडींच्या वादात अयोध्येतील बाबरी मस्जिदीच्या वादग्रस्त जागेवर नव्याने राम मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. तसेच या राम मंदिराचे काम अद्या पूर्ण झालेले नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून २२ जानेवारी २०२४ रोजी लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मात्र याही कार्यक्रमाला देशाच्या घटनात्मक प्रमुख द्रौपदी मुर्मु यांना संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला जसे आमंत्रण दिले नाही. तसेच या कार्यक्रमालाही आमंत्रण दिले नाही. त्याचबरोबर भाजपाबरोबरची राजकिय मैत्री सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण दिलेले नाही.
तरीही उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम काही एकट्या भाजपाचे नाहीत असा पलटवार करत मंदिर उभारणीसाठी निमंत्रण दिलेले नसले तरी आपण अयोध्येला न जाता नाशिक येथील काळाराम मंदिरातील रामाची पुजा करणार असल्याचे जाहिर केले. मात्र देशाच्या घटनात्मक प्रमुख पदावर एक महिला असतानाही त्यांना जाहिर कार्यक्रमासाठी आमंत्रण न देणाऱ्या भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकिय कुरघोडी करत नाशिक येथील रामाच्या पुजेसाठी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना आमंत्रित करून एक पाऊल पुढे टाकले असल्याचे बोलले जात आहे.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी ह्यांना प्रभू श्रीराम ह्यांची महाआरती व महापूजनासाठी पत्राद्वारे आमंत्रित केले. pic.twitter.com/U511Rhne4b
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 13, 2024