उद्धव ठाकरे यांची टीका, आधी पक्ष, मग मतचोरी आता जमीनही चोरायला लागले परभणी, पाटोदा भेटीत शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे

शेतकरी खूप व्यथेने व्याकुळ झाला आहे. भ्रष्टाचार सुरू असल्याने मत चोरीशिवाय पर्याय राहिला नाही. आधी पक्ष चोरला, माणसे चोरली, मतांची चोरी केली. आणि त्यानंतर आता जमीनही चोरल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत भाजपाच्या काळात न्याय मागितला तर नक्षलवादी म्हणत आहे. शेतकर्‍यांना त्याच्या मेहनतीची कर्जमुक्ती मिळावी. कृषी मंत्री कोण याचीच शेतकर्‍यांना माहिती नाही. केंद्रीय पथक कशाचा पंचनामा करणार आहे असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्यातील परभणी, पाटोदा आदी भागाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नाईलाज म्हणुन शेतकर्‍यांवर धोंडा मारण्याचे काम राज्य सरकारने आणले आहे. राज्य सरकारचा श्वास कोंडेपर्यंत शेतकर्‍यांना न्याय मिळणार नाही. शेतकरी हाच आसूड आहे. आत्महत्या करू नका राज्य सरकार शेतकर्‍यांना घाबरेल. आगामी काळात येईल तेव्हा हातात राज्य सरकारचा पंचनामा पाहिजे असेही यावेळी सांगितले.

एका शेतकरी महिलेने आपली व्यथा मांडताना म्हणाल्या की, अतिवृष्टी झाल्याने माझा आणि नवऱ्याच्या डोक्यात आलं होत कि आत्महत्या करावी पण मुलीकडे बघून आम्ही निर्णय बदलला आहे मी दिवाळी फक्त गुलामजामून बनवून केली आणि मुलीला खायला घातल आता तीच मेडिकलच शिक्षण घ्यायचं आहे पैसे नाहीत अशी व्यथा शेतकरी महिलेने उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडली…

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, यानंतर मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेने उचलला आहे. परभणी जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव गावातील एका शेतकऱ्याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना करणार अशी घोषणा करत मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलतोय पण एका अटीवर…. तुम्ही खचून जायचे नाही ….मुलगी पास झाल्यावर पेढे घेऊन मातोश्रीवर यायचे खर्च शिवसेना करेल असेही यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, मराठवाड्यातील अनेक महिला व्यथेत आहे. भारतीय जनता पक्षाने पाठीत खंजीर खुपसले. लॉकडॉऊन मध्ये जगाचा पोशिंदा काम करत होता त्याच्यामुळे आर्थिक चक्र सुरु राहिले. माझ्या हातात काहीही नसताना तुमच्या सोबत संवाद साधण्यासाठी आलो आहे. दगाबाज सरकारला घालवावे लागतील. यांना सोडून चालणार नाही. शेतकर्‍यांच्या मनात ठिणगी पडली तर राज्य सरकारला घरी बसावे लागेल. माझ्यापेक्षा अधिक चांगली कर्जमुक्ती राज्य सरकारने केली तर त्याचे अभिनंदन करेल असेही यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, सरकारला शेतकर्‍यांनी वठणीवर आणल्याशिवाय कर्जमुक्ती होणार नाही. दग़ाबाज सरकारचा पंचनामा करण्याचा आहे. किती जाणला पैसे मिळाले याची माहिती घ्यावी.. अधिकार्‍यांना घेराव घालण्याचा. शेतकर्‍यांना फुकटचे काहीच नको आहे. शेतकरी हात पाय हलवलोय म्हणून अजित पवार मजेत आहे. शेतकरी हक्काचे मागतोय म्हणुन त्याला राज्य सरकार अडवत आहे का असा सवाल करत कर्जमुक्ती होत नाही तो पर्यंत मत बंदीचे होर्डिंग्ज लावा असे आवाहनही यावेळी केले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे भाजपावर टीका करताना म्हणाले की, कुटुंबातला एक सदस्य म्हणून मनातले सगळे सांगताय माझ्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे. राज्य सरकारचे वाभाडे काढण्यासाठी हा दौरा केला आहे. पक्ष आत्मनिर्भर करू शकलो नाहीतर भारत काय आत्मनिर्भर करणार असा उपरोधिक टोलाही भाजपाला लगावला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेतून लोक पळून जात असले तरीही नवीन तरुण मुले येत आहे. शिवसेना मुळापासून मजबूत होत आहे..कोणी कितीही गद्दारी केली तरीही ती संपणारी नाही. शेतकर्‍यांची कृतज्ञता म्हणून शेतकरी कर्जमुक्ती केली होती. शेतकरी संकटात असताना आताच कर्जमुक्ती झाली पाहिजे. थकलेल्या कर्जाचे हप्ते भरावे की भरू नये मुख्यमंत्र्यांनी सांगावे. शेतकरी आत्महत्येचे पाप कोणाच्या माथ्यावर मारण्याचे याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे..अनेक घरे आत्महत्या केल्याने उघडय़ावर पडले त्याचे काय करायचे याचेही उत्तर द्यावे अशी मागणीही यावेळी केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्रात शिवसेनेचे सरकार आले असते तर शेती संबंधित कर कमी केले असते. शेतकरी सरकारच्या अंगावर जाणार नाही तोपर्यंत त्यांना जाग येणार नाही. राज्य सरकारला वठणीवर कसे आणण्याचे शिवसेना बघणार असल्याचेही सांगत शेतकर्‍यांना ५ रुपये देण्याचे आणि गद्दारांना ५० खोके देण्याचे असे काम दगाबाज सरकार करत आहे. किड्यांचे तांदूळ वाटप केली जात असल्याचा आरोपही यावेळी केला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आपत्ती मोठी असल्याने नुकसान भरपाई पण मोठी असायला हवी होती. १८५ रुपये शेतकऱ्यांना गुंठ्याला दिले ही सर्वात मोठी मदत आहे. ठिबक सिंचन प्रमाणे नुकसान भरपाई थेंब थेंब देणे सुरू आहे. शेतकर्‍यांच्या विश्वासाला आम्ही सार्थ ठरणार तर आहोतच, पुन्हा शेतकर्‍यां समोर येऊन बसायचे काम राज्य सरकारचे आहे. शेतकर्‍यांना हिम्मत देण्यासाठी आलो आहे. कुटुंबातील दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्याने घरात वाद सुरू झाला असल्याचे सांगितले

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *