गडचिरोली येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज ८ जुलै रोजी आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार आणि भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं. तसेच भाषणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे नुतन साथी असलेले, पण जुने मित्र असलेले अजित पवार या सरकारमध्ये नुकतेच सहभागी झाले आहेत. त्यांच्या येण्यानं आम्ही एक विकासाचं त्रिशुळ बनलं असून तसंच सर्वसामान्यांच्या विरोधात काम करणाऱ्यांसाठी तिसरा डोळा म्हणून काम करणार असल्याचं सांगितलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही दोघे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) गेल्या वर्षभरापासून काम करत होतो. आता अजित पवार आले आहेत. आम्ही एक त्रिशूळ तयार केलं आहे. हे विकासाचं त्रिशूळ आहे. हे त्रिशूळ राज्यतली गरिबी आणि मागासलेपण दूर करेल. हे त्रिशूळ शंकरासारखं आहे. जे भोळं आहे, परंतु जे लोक या महाराष्ट्रात जनसामान्यांच्या विरोधात काम करतील, त्यांच्यासाठी तिसरा डोळा बनून त्यांना खाक करणारं त्रिशूळ आहे. आमच्या तिघांच्या माध्यमातून तुम्हाला हे त्रिशूळ पहायला मिळेल.
🕑1.47pm | 08-07-2023 📍 Gadchiroli | दु. १.४७ वा | ०८-०७-२०२३ 📍 गडचिरोली.
LIVE | ‘शासन आपल्या दारी’ अभियान.@mieknathshinde @AjitPawarSpeaks#शासन_आपल्या_दारी #Gadchiroli #Maharashtra https://t.co/zAdMIOye2G— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत आलो आहोत. तीन दिवसांपूर्वी आपल्या राष्ट्रपतीदेखील येथे आल्या होत्या. आपल्या भारताच्या लोकशाहीचं सौंदर्य काय आहे बघा. देशातल्या एका छोटाश्या गावातल्या, आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. आपल्या राष्ट्रपती आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे देशााला दिशा देण्याचं काम करत आहेत. याच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांपूर्वी गडचिरोलीत आल्या होत्या, हे आपलं सौभाग्य आहे.