Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचा शरद पवारांना टोला, तोंडात अंजिर आणि हातात खंजीर…. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शरद पवारांवर टीका

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवार यांच्या रूपात नवा भिडू मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गडचिरोली येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी नुकताच शासकिय दौरा पार पडला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्यांच्या तोंडात अंजिर आणि हातात खंजीर असणाऱ्या लोकांचा काय भरोसा असा उपरोधिक टोला शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तसेच अशा लोकांचा भरवासा नाही अशावेळी अजित पवार यांना करायचे ते नेमके कळते. याशिवाय मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील डबल इंजिनच्या सरकारचे विकासाचे काम पाहून अजित पवार हे ही या सरकारमध्ये सहभागी झाल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तसेच कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्याला आणि पक्षासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडविणारा अजित पवारांसारख्या माणसालाही डावलले जाते त्यावेळी विकासासाठी काम करणाऱ्या सरकारच्या मागे उभारण्याशिवाय पर्याय शिल्लक रहात नाही. काही जणांनी घरात बसून काम करत होते. मात्र लोकांनी घरात बसून विकास कामे कऱणाऱ्यांपेक्षा लोकांमध्ये जाऊन कामे करणाऱ्याच्या मागे जाण्यापेक्षा त्यांनी आमच्यासोबत येण्याला प्राधान्य दिल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. याचा अनुभव अजित पवार यांना आला असावा असेही सांगितले.

दरम्यान, नाशिक दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री शाकाहरी असावेत असा खोचक टोला लगावला.

Check Also

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *