Breaking News

उद्धव ठाकरे यांचा पलटवार,…घरात बसलो पण तुमच्यासारख्या घरफोड्या केल्या नाहीत बाळासाहेबांच्या आदेशाने तुम्हाला शिवसैनिकांनी खांद्यावर बसविलं पण तुम्ही आम्हालाच संपविण्याचा प्रयत्न

काल यवतमाळ येथील दिग्रस येथे शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख्य उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्यांनी अकोला आणि अमरावती येथील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाबरोबरचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मागील काही दिवसांपासून माझ्यावर घरात बसला म्हणून टीका करण्यात येत आहे. मी घरात बसून कोणाची घरफोडी केली नाही असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यावर केला.
तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, मी घरात बसून राज्यासाठी काम केलं तरीही कोरोना काळात देशातील चांगल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझं म्हणजे तुमचं सर्वांचं नाव पहिलं होतं. पण तुम्हाला घरफोड्याकरून अद्याप करता आलेलं नाही. त्यामुळे तुमचं नुसतं ह्याचं घरफोड, त्याच घरफोड मग आता त्याच घरफोड असंच सुरु असल्याची टीका भाजपावर केली.

अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो राहीलच. काही लोक तात्पुरते आहेत. एका चुकीमुळे संसदेत जाऊन बसले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्यांचं नाव न घेता केली.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाचे दोन खासदार होते. तुम्हाला कोणी ओळखत नव्हते. या शिवसैनिकांनी तुम्हाला खांद्यावर घेऊन महाराष्ट्र दाखवला. आम्ही हे भूत मानेवर बसून फिरवलं होतं. आज तुम्ही आम्हाला संपवत आहात? हेच तुमचे हिंदुत्व? आम्ही २५ वर्ष सोबत होतो. तरीही आम्हाला संपवलं? असा सवाल भाजपाला केला.

तसेच भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी टीका करताना म्हणाले, भाजपाला त्यांच्या ताकदीवर निवडूण येण्याचा विश्वास राहिला नाही. त्यामुळेच त्यांचे घरफोड्या घरफोड्या सुरु असल्याची टीका करत ते पुढे म्हणाले, सरकारी यंत्रणांच्या मदतीशिवाय एकदा लढून दाखवाच असे आव्हानही भाजपाला दिले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन

ग्रामपंचायत निवडणुकांतील सर्व उमेदवार ट्रू व्होटर ॲपबरोबरच आता पारंपरिक पद्धतीनेदेखील (ऑफलाइन) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *