Breaking News

छगन भुजबळ यांचा पलटवार, मुंबईचा महापौर झाल्याच्या दोन महिन्यांनी रोहित पवार यांचा जन्म मुंबईचा महापौर झाल्याच्या दोन महिन्यांनी रोहित पवार यांचा जन्म

आमदार रोहित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ रोहित पवारांना म्हणाले, माझ्यावर टीका करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घ्या, तुम्हाला इतिहास ठाऊक नाही. छगन भुजबळ प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाले, त्या रोहित पवारला सांगा, मी जानेवारी-फेब्रुवारी १९८५ मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. एप्रिल १९८५ ला मुंबईचा मुंबईचा महापौर झालो. त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा (रोहित पवार) जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मला कोणी मोठं केलं असल्या फालतू गोष्टी करु नका. आधी इतिहास जाणून घ्या.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे अजित पवारांच्या गटातील नेते आणि आमदारांवर सातत्याने टीका करत आहेत. त्यांनी छगन भुजबळ आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच रोहित पवार म्हणाले, भारतीय जनता पार्टीने शरद पवारांचं घर फोडलं आणि आता मजा बघत आहेत. रोहित पवार यांच्या या आरोपाला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं.

छगन भुजबळ म्हणाले, भाजपाचंही एक कुटुंब आहे. गोपीनाथ मुंडे यांचं एक कुटुंब आहे. ते कुटुंब या लोकांनी फोडलं होतं. धनंजयला तुम्ही गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यापासून दूर केलं. धनंजयला दूर करण्यामागे कोण होतं? तुम्हीच होता असा खोचक टोलाही लगावला.

दरम्यान, येवला येथील जाहिर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर थेट टीका करताना म्हणाले, मी कोणावर टीका टीपण्णी करण्यासाठी आलो आहे. माझा अंदाज सहजा चुकत नाही. मात्र यावेळी माझा अंदाज चुकल्याचे सांगत त्याची माफी मागायला आलो असल्याचे स्पष्ट केले.

मात्र शरद पवार यांच्या जाहिर सभेनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत पवारांवर पलटवार करताना म्हणाले, शरद पवार यांनी पाठविल्याने आपण येवल्यात आलो नाही तर आपण पवारसाहेबांना सुचविले आणि त्यानंतर आपण येवला येथील निवडणूक लढविण्यासाठी आल्याचे स्पष्ट केले.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *