मध्यल्या काळात राजकीय घडामोडी झाल्या त्यामधून राज्यामध्ये नवीन समीकरणं तयार झाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंत्रिमंडळात सहभागी झाला. मी सुद्धा मंत्रिमंडळात सहभागी झालो. आपण जरी हा निर्णय घेतला असला तरी आपण काही कोणी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी ही वेगळी राहणार आहे. त्याआधारे आपल्याला भविष्यात काम करायला लागणार आहे. मी गेली ४० वर्षे सार्वजनिक जीवनात काम करतो आहे. १९८१ ते १९८८ पर्यंत आदरणीय पवार साहेबांचा स्वीय सहाय्यक होतो. १९९० ला तुम्ही पहिल्यांदा निवडून दिले. सरकार आपलं होतं. पाच वर्षे सत्तारूढ पक्षाचे आमदार म्हणून काम केले. दुसरी निवडणूक झाली तेथे तुम्ही मला निवडून दिले. १९९५ मध्ये शिवसेना-भाजपाचे सरकार आले. अजितदादा, आर आर आबा, भुजबळ साहेबांनी व अनेक सहकाऱ्यांनी त्याकाळातील सरकारविरुद्ध लढायचे ठरवले. ती लढाई आपण केली. १९९९ च्या निवडणुका झाल्या त्यावेळी तुम्ही मला पुन्हा निवडून दिले.
त्यावेळी आपल्या तालुक्याचे शिष्टमंडळ किंवा मी स्वतः कोणत्या पदाची मागणी केली नाही. आदरणीय शरद पवार साहेबांचा फोन आला की तुला मंत्रिमंडळात समाविष्ट केले आहे, तुला मंत्री म्हणून काम बघायचे आहे. सुरुवातीला उच्च आणि शिक्षण विभागाचा मंत्री होतो. त्यानंतर राज्यात वीजेचा प्रश्न अवघड झाला त्यावेळी वीज खाते कोणीतरी शांत डोक्याने हाताळणे आवश्यक होते. ही जबाबदारी तू घे, असे सांगण्यात आले. मी जबाबदारी घेतली आणि वीजेच्या क्षेत्रामध्ये जे मी काम केले, सरकारने जे काम केले त्याच्यामधून वीजेचा प्रश्न बऱ्याच हलका करण्याचा प्रयत्न केला.
मध्येच लोकसभेच्या निवडणुका आल्या. आपल्या तालुक्याला मायनसमध्ये राहावे लागले. पक्षाने सांगितले तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या. त्यावेळी काही प्रश्न न विचारता राजीनामा दिला आणि सहा महिने बाहेर राहिलो. पुढची निवडणूक झाली मला पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट केले. तेव्हा ऊर्जा विभाग माझ्याकडे देण्यात आला. त्यानंतर पुन्हा काही घटना घडल्या. मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर आर आर पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जयंत पाटील यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी दिली व मला त्यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली. एकच वर्ष अर्थ मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या. बहुमत मिळाले. तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी मला सांगितले की तुला आता विधानसभा अध्यक्ष व्हायचे आहे. प्रतिप्रश्न केला नाही. साहेबांचा आदेश मान्य केला. कामही चांगले करून दाखवले. नंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. तेव्हा विरोधी पक्षाचे पाच वर्षे काम केले. २०१९ च्या निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार साहेबांच्या नियोजनामुळे स्थापन झाले. आम्ही ज्या ज्या वेळेला पक्षात बसायचो त्या त्या वेळी सर्व आमदार तक्रार करायचे, आपली कामं होत नाहीत. त्यामुळे काहीतरी आपल्याला निर्णय घेयला पाहिजे. तो निर्णय आम्ही घेतला. निर्णय सरकारमध्ये जाण्याचा जरी घेतलेला असला. तरी महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्य वाटले ती गोष्ट खरी आहे. त्यात दिलीप वळसे पाटील आहेत. त्यांनी मला इतके वर्षे भरपूर प्रेम दिले आणि सत्तेची स्थानं दिली. तुम्ही लोकांनी मतदान देऊन निवडून दिले. त्यामुळे मी आपल्या मतदारसंघात आणि राज्यामध्ये काम करतो आहे.
निर्णय घेताना पक्षाच्या प्रमुख सात-आठ लोकांनी आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी पक्ष कसा पुढे न्यायचा या संदर्भात बैठक घेऊन चर्चा केली. ही चर्चा सुप्रियाताई सुळे यांच्या कानावर घातली. तुम्ही साहेबांशी बोला. उत्तर मिळाले की दोन दिवस मला द्या दोन दिवसात याबाबत निर्णय घेईल. काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांकडे गेलो आणि पक्षातील आमदारांची भूमिका सांगितली.
त्यातून आजच्या घडीला पक्षातील ३५ -४० आमदारांनी भूमिका घेतली आणि अजितदादा पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. आपल्या मनात शल्य होते की, आपले पवार साहेब हे एक उत्तुंग नेता आहे एवढा मोठा नेता महाराष्ट्रामध्ये असताना, देशामध्ये असताना महाराष्ट्राच्या जनतेने एकदासुद्धा पवार साहेबांच्या ताकदीवर पवार साहेबांचे राज्य आणून दिले नाही. कधी ५०, कधी ६० तर कधी ७० जागा. मग हे जे आघाडीचे सरकार आहे त्यामध्ये जे कमी जास्त होतं ते आपण पाहिले पाहिजे आणि त्याच्यातून हा निर्णय द्यावा.
निर्णय घेताना पक्षाच्या प्रमुख सात-आठ लोकांनी आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी पक्ष कसा पुढे न्यायचा या संदर्भात बैठक घेऊन चर्चा केली. ही चर्चा सुप्रियाताई सुळे यांच्या कानावर घातली. तुम्ही साहेबांशी बोला. उत्तर मिळाले की दोन दिवस मला द्या दोन दिवसात याबाबत निर्णय घेईल. काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांकडे गेलो आणि पक्षातील आमदारांची भूमिका सांगितली.
त्यातून आजच्या घडीला पक्षातील ३५ -४० आमदारांनी भूमिका घेतली आणि अजितदादा पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. आपल्या मनात शल्य होते की, आपले पवार साहेब हे एक उत्तुंग नेता आहे एवढा मोठा नेता महाराष्ट्रामध्ये असताना, देशामध्ये असताना महाराष्ट्राच्या जनतेने एकदासुद्धा पवार साहेबांच्या ताकदीवर पवार साहेबांचे राज्य आणून दिले नाही. कधी ५०, कधी ६० तर कधी ७० जागा. मग हे जे आघाडीचे सरकार आहे त्यामध्ये जे कमी जास्त होतं ते आपण पाहिले पाहिजे आणि त्याच्यातून हा निर्णय द्यावा.
माझ्या समोर पेच होता की कोणता निर्णय घ्यावा. मध्यंतरी मंत्रिमंडळात घटना घडली होती. आम्ही मंत्रिमंडळात होतो. तेव्हा प्रस्ताव मांडला की डिंभेचे जे पाणी आहे त्याला बोगदा करून पलीकडे न्यायचे. जेणेकरून ते खाली जाईल. मी अहमदनगर जिल्ह्याचा १० वर्षे पालकमंत्री होतो. पण कधी अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्नावरून वाद निर्माण करून दिला नाही. शेवटी आम्ही साहेबांकडे गेलो आणि दोन तीन मीटिंग झाल्या. डिंभेचा बोगदा वरती करायचा. त्यानंतर सरकार बदलले. फडणवीस यांच्या सरकारने हा बोगदा वरती न करता धरणाच्या मुखाशी खाली करायचा अशा निर्णय घेतला. आंबेगाव, शिरुर, जुन्नर, पारनेर या तालुक्यात जे ६५ बंधारे बांधलेले आहेत. या ६५ बंधाऱ्यात गेली २५ वर्षे पावसाने बंधारे भरतो. जेव्हा पाणी कमी पडेल तेव्हा सोडतो. पण सरकारने निर्णय घेतला की पावसाने पाणी भरेल तेवढेच तुम्हाला पाणी सोडले जाईल. त्यानंतर पुन्हा पाणी बंधाऱ्यातून सोडण्यात येणार नाही. याचा परिणाम काय होईल. आपल्या जिल्ह्यात साखर कारखाने आहेत. ऊसाला पाणी मिळाले नाही तर ऊसच जर आला नाही. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडून जाईल. ज्यावेळी दुष्काळी भागातून आपण त्या भागाला बागायती केलं. तेव्हा आपल्या सर्वांचे जीवन सुखी झाले. उद्या हयातभर मी आमदार राहीन किंवा मंत्री राहीन असे नाही. ही परिस्थिती जर आली तर येथील परिसर दुष्काळी झाल्याशिवाय राहणार नाही. निर्णय घेताना मोठी ताकद असावी लागते. आम्ही निर्णय घेतला आणि साहेबांना सांगितले. साहेबांनी संमती दिली नाही. परंतु ५५ पैकी ४० आमदार असा निर्णय घेतात त्याला काहीतरी कारण असेल. तर मग अशी चर्चा आली की ज्याच्यावर ईडी किंवा आयकर विभागाची नोटीस आहे त्या लोकांनी घाबरून जाऊन स्वतःला सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला. तो प्रश्न कोर्टात आहे तो सर्वांना माहीत आहे. आंबेगाव तालुक्याचा आमदार म्हणून महाराष्ट्रातील सर्व जनतेला सांगतो. दिलीप वळसे पाटलावर कुठेही ईडीची नोटीस नाही. कुठलेही सीबीआयची व आयकर विभागाची नोटीस नाही. कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी नाही, समाजाच्या हितासाठी हा निर्णय घेतला.
पराग डेअरीमध्ये माझी किंवा कुटुंबाची एक रुपयाची गुंतवणूक नाही. शाह कुटुंबियांशी संबंध हे स्व. दत्तात्रय वळसे पाटील यांच्या वेळेपासून आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केला की गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी शिवसेनेच्या आमदारांना मदत केली. ज्या सरकारमध्ये गृहमंत्री आहे जर ते लोक गेले तर सरकार पडेल याची पूर्ण कल्पना असताना त्यांना कशी मदत होऊ शकते. परंतु तेव्हा उद्धव ठाकरे यांना कळवण्यात आले होते की, आमच्याकडे रिपोर्ट आहे की, तुमच्या पक्षात खूप काही गडबड चालू आहे. तुम्ही त्याबाबत काहीतरी करा. त्यानंतर असे हे सर्व घडले. सरकार पडले. मी कशी मदत करू शकतो जर मी हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पवार साहेबांच्या कानावर घातले आहे. जर उद्धव ठाकरेंनी पक्षाची काळजी घेतली असती तर सरकार पडले नसते.
आमदार रोहित पवार यांनी पोस्ट टाकली तुम्हाला आणखी काय काय द्यायला पाहिजे. साहेबांनी सगळं दिल. काही कमी पडू दिलं नाही. जीवनाच्या अंतापर्यंत आम्ही त्याचे कृतज्ञ राहू. एक दिवशी रोहित पवार यांची भेट झाली. त्यांना बोललो की मी आमदारकी सोडतो तुम्ही आंबेगावात उभे रहा. माझे साहेबांशी व त्यांच्या कुटुंबियांशी कोणतेही भांडण नाही. मी सत्तेसाठी हपापलेलो नाही. आपल्याला आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवायचे आहेत. आता दीड वर्षे बाकी आहे. सहा महिन्यांनी लोकसभेच्या व त्या सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येतील. हा निर्णय जनतेच्या हातात आहे. मी कोणालाही आग्रह करणार नाही की असंच करा आणि तसंच करा. ज्यांनी त्यांनी आपापल्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा. आज आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत ते पहिल्यांदा जातो का, असे नाही. ज्यावेळी १९७८ साली पुलोद सरकार होते, काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी पवार साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयात आपण सहभागी झालो. राजीव गांधी यांची सभा झाली. पुन्हा काँग्रेसमध्ये गेलो. साहेबांना काही दिवस मुख्यमंत्री पद दिले. आपण सुद्धा सोनिया गांधी यांच्या सिटीझनशिपवरून वेगळी भूमिका घेतली त्यावेळी सुद्धा आपण सर्व साहेबांसोबत राहिलो. आपली लढाई साहेबांशी नाही. ज्यावेळी साहेबांची इथे सभा असेल तेव्हा आपण सर्वांनी तिथे जावे. कारण आपल्या तालुक्याला त्यांनी भरभरून दिले आहे. कारखाने, बँक, पाटबंधारे निर्माण केले तेव्हा दरवेळी सांगतो की हे सर्व आदरणीय पवारसाहेबांमुळे झाले. उद्या निवडणुकीत जे व्हायचं ते होईल त्याची मी फार चिंता करत नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन गट निर्माण झाले. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या तालुक्यातील लोकांना काही कमी पडू देणार नाही, असा शब्द देतो.
काहींनी निष्ठेचा प्रश्न उपस्थित केला. ज्यांना मी दहा-अकरा वर्षे साखर कारखान्याचा चेअरमन केले, सात वर्षे मार्केट कमिटीचा चेअरमन केले, लोकसभेला तिकिट दिले, आता त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी स्वतःचे नशीब आजमावून बघायला हरकत नाही. आपण सगळे मिळून आपल्या परिसराचा विकास कसा होईल, प्रगती कशी होईल हे आपण त्यांच्यामध्ये काम मिळून करू. ज्या मतदारांनी सातवेळा निवडून दिले त्यांचे मनापासून आभार मानतो.