Breaking News

राजकारण

अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना मिळणार २ लाखापर्यंत कर्ज पहिल्या टप्प्यात ७५० बचतगटांना मिळणार योजनेचा लाभ-अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे अल्पसंख्याक महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. पहिल्या टप्प्यात …

Read More »

उद्घाटनाला, बारमध्ये गर्दी चालते मग अधिवेशनावेळीच कोरोना कसा आठवतो? तिघांच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात का टाकता? : देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, विविध समाजबांधव यांचे अनेक प्रश्न आज ऐरणीवर असताना, मराठा तसेच ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी होत असताना केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. तीन पक्षांच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात का टाकता? तीन पक्षांच्या राजकारणासाठी जनतेचा आणि लोकशाहीचा बळी देणे, हे अतिशय दुर्दैवी …

Read More »

लस घेतली तरी विधिमंडळ अधिवेशनासाठी कोरोना चाचणी आवश्यकच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज निश्चित

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी ५ व ६ जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात झाली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, …

Read More »

दबावतंत्रापुढे मविआ सरकार झुकणार नाही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी तपास यंत्रणांना हाताशी धरून मविआ सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजपा सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून राज्यातील मविआ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही त्यांना केंद्रीय तपास …

Read More »

प्रशांत किशोर आणि शरद पवार भेट: उद्या दुपारी विरोधी पक्षांची बैठक देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राजकिय निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा दिल्ली येथील पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली असून उद्या भाजपा विरोधी पक्षांची बैठक होणार असून सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम शरद …

Read More »

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली थेट मुख्यमंत्री येडियुरप्पांची भेट अलमट्टी धरण पाण्याविषयी दोन्ही राज्यांचा योग्य समन्वयासाठी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बंगलूर येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई तसेच कर्नाटक राज्याचे मुख्य …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या काँग्रेसला कानपिचक्या तर भाजपाला टोले शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनी साधला शिवसैनिकांशी संवाद

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून काहीजण स्वबळाचा नारा देत आहेत. पण स्वबळाचा नारा म्हणजे फक्त निवडणूकी पुरताच नसतो. अन्यायाच्या विरोधात वार करण्यासाठी ते उचलण्यासाठी लागंत ते स्वबळ असत. त्यासाठी स्वबळ कमावावे लागते असा टोला काँग्रेसचे नाव न घेता लगावत कोरोनानंतरची परिस्थिती आणि येणाऱ्या आर्थिक संकटाचा कोणताही विचार न …

Read More »

दहा मानाच्या पालख्या ” लाल परी ” ने विठ्ठल भेटीला परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची ” लालपरी ” धावणार …

Read More »

ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपाचा २६ जूनला राज्यात चक्काजाम प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी …

Read More »

इलेक्ट्रीक वाहनांची चार्जिंग स्टेशन उभी राहणार : धोरण मसूदा सादर करा लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देणे गरजेचे असून यासाठीचे सर्वंकष सुधारित धोरण निश्चित करावे व लवकरात लवकर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस परिवहन मंत्री ॲड.अनिल …

Read More »