Breaking News

प्रशांत किशोर आणि शरद पवार भेट: उद्या दुपारी विरोधी पक्षांची बैठक देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी राजकिय निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा दिल्ली येथील पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली असून उद्या भाजपा विरोधी पक्षांची बैठक होणार असून सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम शरद पवार हे उद्यापासून हाती घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक उद्या मंगळवारी (२२ जून) दिल्लीत होत असून या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि परमनंट सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीनंतर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार आहेत. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत पवारसाहेबांची भेट घेतली होती आणि आज दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिली आहे.

उद्या मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

भाजप दररोज सरकार येईल या आशेवर नवनवीन विषय समोर आणतेय – मलिक

भाजप दररोज सरकार येईल या आशेवर नवनवीन विषय समोर आणून आज सरकार जाणार आहे… उद्या सरकार जाणार आहे असे बोलत आहे. परंतु हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेलच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकार जाणार… लवकरच कोसळणार ही भाजपने जाहीर केलेली एकही भविष्यवाणी किंवा तारीख खरी ठरत नाहीय असा टोलाही लगावत ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर बनवण्यात आले आहे. सरकार जनहिताची कामे करतंय आणि सरकारच्या कामकाजावर जनता समाधानी आहे.

Check Also

अजित पवार यांची माहिती,… समाधान होईल अशा जागा मिळणार

२८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *