Breaking News

शिवसेनेतील बंडावर शरद पवार म्हणाले, आताची परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ भाषणामुळे… निवडणूकांसाठी आतापासून तयारी करण्याचे आदेश दिले

राज्यात शिवसेनेमध्ये झालेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेले. त्यानंतर याबाबत शरद पवार यांनी पहिल्यांच भाष्य करताना म्हणाले की, शिवसेनेत जे बंड झाले. त्या बंडखोरांकडे बंडाचे नेमके कारणच नाही. त्यांनी सुरुवातीला एक कारण दिले. आता वेगळेच कारण सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या बंडाला नेमके कारणच नाही. मात्र शिवसेनेत अशावेळी असलेली परिस्थिती आता कदाचीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या त्या दिवशीच्या भाषणामुळे असेल असेही ते म्हणाले.

औरंगाबाद येथील दौऱ्यावर आले असता ते बोलत होते. शिवसेना पक्षांतर्गत काही गोष्टींवर निर्णय झालेला असावा. त्यानंतर काही तरी झाले असेल त्यामुळे बंडखोरांनी पक्षांतर्गत बंड केले असावे असे सांगत शरद पवार पुढे म्हणाले की, पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्तीला मुख्यमंत्री पदाची खुर्ची आणि वर्षा बंगल्यावर जावून रहायला मिळाले. पण त्यांच्या पक्षात झालेल्या बंडामुळे त्यांना वर्षा बंगला सोडावा लागला.

पूर्वी बंड झाले होते. मात्र त्यावेळची परिस्थिती अशी नसायची. मात्र त्यादिवशी टिव्हीवर झालेले मुख्यमंत्री ठाकरेंचे भाषण मी ऐकले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करत कोणीही रस्त्यावर उतरू नका, त्यांच्या मध्ये कोणी येवू नका असे सांगत मला मुंबईच्या रस्त्यावर रक्तपात नको असेही ते म्हणाले होते. त्यामुळे आताच्या बंडानंतर कदाचीत आताची परिस्थिती असेल असेही ते म्हणाले.

वास्तविक पाहता आता त्या बंडामागे नेमके कारणच नसल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, त्यांच्या पक्षात कोणतातरी एक निर्णय झाला असावा. त्यानंतरच या गोष्टी घडल्या सारखे वाटते. मात्र बंडखोराकडून त्यांच्या बंडाचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट सांगितले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती निवडणूकीत उमेदवारी का नाकारली ? शरद पवार यांनी दिले ‘हे’ उत्तर

मागील ४०-५० वर्षापासून सक्रिय राजकारणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशातील सर्व विरोधकांकडून उमेदवारी देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. तरीही शरद पवार यांनी ती उमेदवारी का नाकारली. त्यामुळे कोणत्या कारणामुळे नाकारली याबाबत थोडेशी उत्सुकता निर्माण झाली होती. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता शरद पवार यांनी दिलेल्या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा उमटला. शरद पवार हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सध्या देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. मात्र ही निवडणूक एकांगी होत असताना दिसत आहे. जर आपण या निवडणूकीत उमेदवार असता तर ही दोन्ही निवडणूक दुरंगी असल्याचे दिसून आले असते असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर शरद पवार यांनी फारच मिश्किल टिप्पणी करत उत्तर देताना ते म्हणाले की, राज्यात मला बघुन कंटाळा आला की काय असे उत्तर दिले. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मला फक्त ह्या गोष्टींचा त्रास बाकी काही नाही

मी आजही गाडीने फिरतो. लोकांना भेटतो, त्यांचे ऐकतो. सत्ता असो की नसो मात्र मी लोकांशी बोलत राहतो. लोकांच्या संपर्कात राहतो. लोकांमध्ये राहतो म्हणूनच मी उत्साही आणि सतत कामात राहतो. सत्तेत असताना आपण घेतलेले निर्णय लोकांपर्यत किती पोहचले याची माहिती मिळते. तसे त्याचा लाभ होतोय की नाही हे ही समजते. त्यामुळे मी आजही सक्रिय आहे. मला फक्त तोंडाचा आणि पाय फ्रॅक्चर असल्याचा त्रास आहे. बाकी काही नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी म्हणून निवडणूकीला सामोरे जावे

राज्यात सत्ता असतानाही आताही आगामी निवडणूका या महाविकास आघाडी म्हणून सामोरे जावे अशी माझी इच्छा आहे. मात्र यासंदर्भात माझी काँग्रेस किंवा शिवसेनेनेशी बोलणे झाले नाही. त्यामुळे त्याबाबत मी बोलणार नाही. परंतु योग्य वेळ आल्यानंतर त्यासंदर्भातील चर्चा करून नंतर निर्णय जाहिर करू असेही ते म्हणाले. बाकी मी मध्यावधी निवडणूका होणार असे भाकित केले नव्हते तर निवडणूकांना अद्याप दोन-अडीच वर्षे बाकी आहेत. त्यामुळे आतापासून तयारी लागा अशी सूचना मी आमच्या नेत्यांना केल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *