मागील काही महिन्यापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याची माहिती पुढे आली. वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर बीडमधील अनेक खून प्रकरणांना वाचा फुटली. त्यातच वाल्मिक कराड यांचे आका धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही होऊ लागली. परंतु धनंजय मुंडे यांच्या राजीनामा काही केल्या होत नव्हता. अखेर संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे अंगावर शहारे आणणारे फोटो काही प्रसारमाध्यमांवर प्रसारीत झाले. तसेच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करूणा मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला असल्याचे जाहिर केले होते. अखेर आज सकाळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्री पदाचा राजीनामा सादर केला.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी अजित पवार यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे बोट दाखवले. शेवटी शेवटी तर अजित पवार यांनी तुम्ही धनंजय मुंडे यालाच विचारा राजीनामा कधी देणार म्हणून अशी विनंती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना केली होती.
मात्र संतोष देशमुख हत्येच्या घटनेच्या दिवशीचे काही फोटो काल रात्री व्हायरल झाले. त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडे यांनी आज सकाळी राजीनामा दिला. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात एक प्रतिक्रिया आणि राजीनामा का दिला याविषयीची कारणही ट्विट केले आहे.
राजीनामा दिल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे एक्सवरील ट्विटमधील प्रतिक्रियेत म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या निर्घण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. कालच समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरूण आणि मागील “काही दिवसांपासून माझी प्रकृती ठिक नसल्याने आणि पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयाकडे दिला” आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025
Marathi e-Batmya