हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याप्रकऱणी केली टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देण्याच्या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘मूंह में राम, बगल में छुरी’, ही भाजपाची मोडस ऑपरेंडी आहे. महात्मा गांधी यांचा खून करण्याआधी नथुराम गोडसे सुद्धा गांधीजींच्या पाया पडला व नंतर तीन गोळ्या झाडल्या हा इतिहास आहे. आजही त्या गोडसेचे गुणगान गाणाऱ्या औलादींना भाजपा पोसत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. धमकी देणारा म्हणतो ‘आम्ही नथुराम गोडसे होऊ’ ते तर नथुराम गोडसे आहेतच, पण तुमचा पक्षही नथुराम गोडसेंच्या विचाराने चालला आहे. तर बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील वातावरण खराब करावे म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात अशी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्याचा काहींचा प्रयत्न दिसत आहे.

हर्षवर्धन सपकाळ शेवटी बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पक्ष अशा लोकांना का पाळतो, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. भाजपाने असे राजकारण करू नये आणि आज भाजपा विरोधकांवर ज्यांना सोडतो तेच उद्या भाजपाच्या अंगावर येतील असा इशारा देत अशा धमक्या देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच प्रोत्साहन आहे त्यामुळे कारवाई होणारच नाही, असा आरोपही यावेळी केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *