Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा इशारा, …तर कारवाई राहुल गांधीं यांच्यावर करू

मागील दोन-तीन दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने राहुल गांधींच्या वक्तव्यावर सहमत नसल्याचे सांगितले आहे. मनसेने आक्रमक पवित्रा घेत राहुल गांधी विरोधात आंदोलन केले. याशिवाय राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीसांनीही आव्हान दिलेलं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काम करावं कायद्याच्या चौकटी बाहेर त्यांनी काय केलं तर आम्हाला कारवाई करावी लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

कायदा मोडणाऱ्यावर लोकांवर कारवाई करून काही फायदा नसतो, अनेक लोक केसेस ते भोगत आहेत. ते तसेही बेलवरच आहेत. कोर्टात हजर राहत नाहीत म्हणून त्यांचे वॉरंट निघतात. अनेकजण खोटं बोलतात आहेत, त्याला उत्तर देता येतं. अनेकदा आपल्याला जास्त प्रसिद्धी मिळावी, सुरुवातीला त्यांच्या यात्रेला प्रसार माध्यमांकडून जास्त प्रसिद्धी मिळत नव्हती. ती जास्त मिळावी म्हणून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत केला जात असल्याचेही ते म्हणाले.

तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकप्रकारे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे सगळं सुरू आहे. ते जे काही करत आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काही केलं तर ठीक, पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर त्यांनी काही केलं तर त्यावर कारवाई आम्हाला करावी लागेल. बाकी त्यांच्या यात्रेला आम्ही सुरक्षा दिली आहे. सुरक्षितपणे त्यांची यात्रा बाहेर काढावी. मात्र महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये असा इशाराही दिला.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर लोकांमध्ये नाराजी आहे. कारण, रोज इतकं खोटं बोलायचं १३-१४ वर्षे ज्यांनी काळ्यापाण्याची तुरुंगवासाची शिक्षा भोगली, त्यांच्याबद्दल अशाप्रकारे ज्यांनी पायरी देखील पाहिली नाही, अशा लोकांनी बोलावं? हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात फार मोठा राग असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *