मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांच्या यास अटक केली. त्यानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या मैत्रीच्या अनेक सुरस कथा बाहेर येऊ आल्या. त्यामुळे अखेर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यातच आता पुन्हा एखदा धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचे वेध लागले आहेत.
रायगडचे खासदार तथा महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा नागरी सत्कार कर्जत येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे हे ही यावेळी उपस्थित होते. यावेळी भाषण करताना धनजंय मुंडे यांनी त्याच्या मनातील खंत सुनिल तटकरे यांच्यासमोर व्यक्त केली.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मला यापूर्वी विरोधी पक्षनेते पद विधान परिषदेत मिळालं होतं. खरंतर त्यावेळी सुनिल तटकरे हे विरोधी पक्षनेते होणार होते. परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत ती जबाबदारी माझ्यावर सोपविली. त्यामुळेच मी आज उभा आहे. माझ्यासारखे असंख्य तरूण उभे आहेत ते फक्त सुनिल तटकरे यांच्यामुळेच. आज त्या सुनिल तटकरे यांना भारतभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे त्याचं अभिनंदन करण्यासाठी उभा आहे. मी संपूर्ण बीडमधील जनतेच्यावतीने त्यांना शुभेच्छा देतो. तसेच परळीच्या वैद्यनाथालाही प्रार्थना करतो की, आमच्यापेक्षाही चांगल आरोग्य सुनिल तटकरे यांना मिळो आणि आम्ही थकलो तरी आम्हाला हात देऊन उठवू शकतील इतकं चांगल आरोग्य त्यांना मिळावं अशी प्रार्थना करतो असे सांगितले.
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, माझी सुनिल तटकरे यांना विनंती आहे की त्यांनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत रहावं आम्ही चुकलो तर आमचे कान धरावे, चुकलो नाही तर चांगलंच आहे. पण आता रिकामं ठेवू नका जबाबदाऱ्या द्या एवढीच मी त्यांना विनंती करतो अशी मागणीही यावेळी केली.
दरम्यान, याच कार्यक्रमात सुनिल तटकरे यांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करणार असल्याची घोषणा केली.
तर छगन भुजबळ म्हणाले की, जो पर्यंत जबाबदारी दिली जात नाही तोपर्यंत स्व. गोपीनाथ मुंडे यांचे अधुरे राहिलेली स्वप्न पूर्ण करावे असा सल्ला भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना दिला.
Marathi e-Batmya