Breaking News

राज्यातला ४ था लॉकडाऊन पोलिसांच्या नव्हे तर पॅरामिलिटरी फोर्सेसच्या बंदोबस्तात जम्मू व काश्मीरमधील १० युनिटसह १८ पथके तैनात होणार

मुंबई:प्रतिनिधी
राज्यात संभावित कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वात आधी अर्थात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केला. राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने याबाबतची घोषणा केली. मात्र राज्यात सलग ३ वेळा लॉकडाऊन वाढविण्यात येवूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परंतु आता लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ४ थ्या लॉकडाऊनची घोषणा करतानाच कोरोनाग्रस्त भागांतील बंदोबस्ताची जबाबदारी पॅरामिलिटरी फोर्सेसकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती गृहविभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबई महानगरासह कोरोबाधीत असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी सेंट्रल आर्मड् पोलिस फोर्सेसच्या ९ कंपनी सध्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत. तर आणखी एक कंपनी लवकरच पोहोचणार आहे. या फोर्सच्या प्रत्येक कंपनीत किमान १०० जणांचा समावेश असून या जवानांना जम्मू काश्मीरमध्ये कर्फ्युची अमलबजावणी करण्याचा दांडगा अनुभव आहे. महाराष्ट्रासाठी खास काश्मीरमधील अशा १० तुकड्या विड्रॉल करण्यात आल्या आहेत. याशिवाय रॅपिड अॅक्शन फोर्सच्या ४, सीआरपीएफच्या २, सीआयएसएफच्या ३, आणि मुंबईस्थित आरएएफची युनिट्स या लॉकडाऊनमध्ये बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यत लागू राहणार आहे. त्यामुळे याकालावधीतील सर्व बंदोबस्त आणि याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या पॅरामिलिटरी फोर्सेसवर राहणार आहे. तसेच त्यांच्या दिमतीला स्थानिक पोलिस प्रशासन राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे भाजीपाला-रेशन, दुध आणायला गेलो असले सबब देवून घराबाहेर नागरिकांना पडता आणि फिरता येणार नाही.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *