Breaking News

जयराम रमेश यांचा सवाल, मतदानासाठी पीएम किसानचा हप्ता रोखला होता का?

देशातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे मतदान जवळ आले की, केंद्रातील मोदी सरकारकडून महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेल्या योजनांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जातात. त्याच सरकारी योजनांच्या पैशातून जनतेची मतं खरेदीचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याची चर्चा दस्तुरखुद्द भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने ऐकायला मिळत होती. त्याच चर्चेच्या अनुषंगाने काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधील मतदान मिळविण्यासाठी हप्ता रोखला होता का असा सवाल उपस्थित केला.

जयराम रमेश यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या आधारे जयराम रमेश यांनी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या हप्ता वाटपाचाचे तारखेसह माहिती दिली. तसेच आगामी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये २ दिवसात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होत आहे. तर राजस्थानमध्ये १० दिवसात तर तेलगंणामध्ये १५ दिवसात विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाची तारीख आहे. मात्र पीएम किसानच्या १५ वा हप्ता १५ नोव्हेंबर रोजी अर्थात आजची असून या निवडणूकांमध्ये मतदारांनी भाजपाला मतदान करावे यासाठी या योजनेचा हप्ता रोखून धरला होता का असा सवाल केला. तसेच पीएम किसान योजनेचे हप्ते जाणीवपूर्वक मतदान मिळविण्यासाठी रोखून धरण्यात आल्याचा आरोपही केला.

दरम्यान, जयराम रमेश यांनी पीएम किसानचा ६ वा हप्ता १ ऑगस्टला २०२० ला दिला गेला. ९ वा हप्ता, ९ ऑगस्ट २०२१ रोजी देण्यात आला. १२ वा हप्ता १७ ऑक्टोंबर २०२२ रोजी दिला गेला. १५ वा हप्ता १५ नोव्हेंबर २०२३ रोजी अर्थात देण्याची घोषणा केली. त्यावरून या चारही राज्यातील विधानसभा निवडणूकीसााठी मतदान होत आहे. या राज्यातील मतदान भाजपाला मिळावे यासाठीच आजची तारीख करावी असा सवालही केला.

Check Also

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *