छात्र भारतीचे आव्हान: अनिल बोंडेंच्या घरासमोर आंतरधर्मीय विवाह लावणार छात्र भारतीचे राज्यध्यक्ष रोहित ढाले यांची घोषणा

भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी आंतरधर्मीय विवाहाविरोधात खाजगी विधेयक मांडणार असल्याचे मत व्यक्त केले. सर्वच आंतरधर्मीय विवाह हे फसवून, धमकावून होत नाहीत हे ठणकावून सांगण्यासाठी येणाऱ्या काळात अनिल बोंडे यांच्या घरासामोरच छात्रभारती आंतरधर्मीय विवाह लावून देणार असल्याचे छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले.

मुलींना प्रलोभने देऊन, गिफ्ट देऊन धमक्या देऊन मुलींना पळवून असे विवाह जिल्ह्याबाहेर होतात असेही बोंडे म्हणाले होते. लोकप्रतिनिधींनी असे बेजबाबदारपणे बोलणे हे निंदणीय आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटना अश्या सर्व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुण-तरुणींसोबत खंबीरपणे उभी आहे, असे ढाले यांनी सांगितले.

ह्या सर्व वक्तव्यामागचा सूर हा धर्मांध आहे. दोन धर्मा-धर्मांमध्ये विष पेरण्याचा कट आहे. देशाच्या शांततेला धक्का पोहचवून आपले मतांचे गणित टिकवण्याचा हा केविलवाणा प्रयोग असल्याचेही ढाले यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. अनिल बोंडे यांचे सुपुत्र हे परदेशात शिकायला गेले होते. तेथे त्यांच्या मुलाला एक परदेशी मुलीसोबत प्रेमसंबध निर्माण झाले. त्यातून त्यांच्या मुलाने त्या परदेशी मुलीशी लग्न केले. त्या लग्नाचा रिसेप्शन सोहळाही अमरावतीतील मोर्शी या त्यांच्या बालेकिल्ल्यात पार पडला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *