Breaking News

संतापलेले सोमय्या म्हणाले, शिव्या दिल्या तरी राऊतांबद्दल द्वेष नाही, ते खरे चाणक्य मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बायकोची बाजू घेणार नाही का?

मागील काही दिवसांपासून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राऊत यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्याासाठी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊतांनी मला कितीही शिव्या दिल्या तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष नाही. कारण ते शब्द संजय राऊतांचे नसून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आहेत. तसेच संजय राऊतच खरे चाणक्य असल्याचे कौतुगोद्वार काढले.

त्यादिवशीच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनीच रश्मी ठाकरे यांच्या त्या १९ बंगल्याच्या खरेदीचा विषय उकरून काढला. तसेच ठाकरे यांच्या नातेवाईकाने देवस्थानची केलेली जमिन खरेदी आणि राकेश वाधवान यांचे नाव त्यांनी जाणीवपूर्वक घेत अप्रत्यक्ष शरद पवार यांना शह देण्याचा प्रयत्न केलेला असल्याचा दावा करत संजय राऊत याला मला जी भ** म्हणून दिलेल्या शिवीचा तरी अर्थ माहित आहे का? असा सवाल करत त्याचा अर्थ माझ्या आईला आणि बायकोला जावून विचार, माझी बायको मराठी, दोन्ही सुना मराठीच आहेत असे ते संतापून म्हणाले.

त्याचबरोबर किरीट सोमय्या यांनी एक गौप्यस्फोट करत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ११ ऑक्टोंबर २०२१ रोजी मला पत्र लिहील्याची उघडकीस आणत त्या पत्रात त्यांनी प्रिय किरीट अशी सुरुवात करत भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे तुम्ही सार्वजनिकरित्या उघड केली आहेत. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागले. भ्रष्टाचाराविरोधातील आपल्या लढ्यास बळ मिळावे, असं त्या पत्रात नमुद केल्याचे त्यांनी वाचून दाखविले. तसेच चार महिन्यांपूर्वी माझे कौतुक करणारे उद्धव ठाकरे आता माझा इलाज करावा लागणार, अशी भाषा बोलत आहेत, त्यामुळे शिवसेनेला नेमके काय म्हणायचाय, असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचा सवाल त्यांनी केला.

ज्या कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी भागीदारीत अन्वय नाईक यांच्याकडून जागा खरेदी केली. त्यानंतर त्यांनी गावच्या सरपंचाला ३० एप्रिल २०१४ साली पत्र लिहून खरेदी केलेली जागा आणि त्यावरील घरे आपल्या नावावर घरे करावी अशी विनंती केल्याचे पत्रच त्यांनी यावेळी वाचून दाखविले. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये आणि २३ मे २०१९ रोजी पुन्हा रश्मी ठाकरेंनी कोर्लईच्या सरपंचांना पत्र लिहिल्याचा दावा केला. तसेच हे पत्र आपल्याला कोर्लई ग्रामपंचायत आणि तलाठ्यांनी दिलेलं असल्याने ती पत्रे खोटे असल्याचे तुम्ही म्हणूनच शकत नसल्याचे ते म्हणाले.

कोर्लई गावाचा सरपंच सकाळी एका टीव्हीशी बोलतानना म्हणतो त्या जागेवर बंगले होते. दुपारी एका चॅनलशी बोलताना बंगले नव्हते म्हणतो. त्यामुळे १९ बंगल्यांचा घोटाळा उघडकीस आणल्यानं मला जोड्याने मारण्याची भाषा केली जाते. परंतु स्वतः मुख्यमंत्री १२ कोटी जनतेची फसवणूक करत आहेत, त्याचे काय, असा सवाल त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणावर एकही वाक्य बोलण्याची हिंमत मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या एकही नेत्यामध्ये नसल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी दिला.

“लाइफलाइन हेल्थ केअर आणि इटर्नल हेल्थ केअर या दोन्ही कंपन्यावर जर गुन्हे दाखल केले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह आणखी काही जण अडकतील असा इशारा देत १९ बंगल्याप्रकरणी कोर्लई गावचा सरपंच बोलतो मग उध्दव ठाकरे का बोलत नाही असा सवाल करत बायकोची बाजू घ्यायची नाही का? असा उपरोधिक सवालही त्यांनी यावेळी केला.

ईडी ऑफिसरने माझ्या प्रकल्पात पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केला. मी विचारतोय, कुठल्या अधिकाऱ्याने पैसे दिले?, मला सांगा. त्या अधिकाऱ्याविरोधात मी तक्रार दाखल करतो. पालघरच्या जमिनीचं व्हॅल्युएशन मुख्यमंत्री ठाकरेंच्या कलेक्टरने केले, त्याची किंमत १५ कोटी दाखविली असता राऊत हे त्या जागेचा आकडा २६० कोटी रूपये सांगतात. तर ज्या वसईच्या जागेवरून राऊत आरोप करतात ती जागा माझ्या वडीलांची होती. वडील गेल्यानंतर ती जागा माझ्या आईच्या नावावर झाली. त्यानंतर ती माझ्या बायकोच्या नावावर केल्याचे सांगत त्याची किंमत ४.५० असताना त्या जागेची व्हॅल्युएशन ४०० कोटी रूपये सांगतात असे सांगत संजय राऊत यांनी केलेल्या आरोपातील हवाच काढून घेतली.

संजय राऊत यांनी ईडीकडे जाण्याचा इशारा दिला होता त्यावर बोलताना म्हणाले की, पत्रकार परिषद घेऊन २ ट्रक पेपर घेऊन जाणार म्हणतात, काय सेन्सेशन करता? ७५००कोटी अमित शहा, फडणवीस यांना दिले काय म्हणता? ईडीकडे तक्रार करण्याची काय पद्धत आहे माहिती तरी आहे का? राज्य सरकारने तक्रार रजिस्टर करायची असते. मग ईडीकडे जायचं असतं अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *