महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर सोयाबीन, कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे सरकार आहे. महायुती सरकारच्या उद्योग, पर्यटन, कृषी, समाजकल्याण क्षेत्रातील अनेकविध योजनांमुळे संपूर्ण विदर्भासह उमरेड परिसराचे चित्र आता पूर्णपणे बदलून जाणार आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबविण्यासाठी भाजपा महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.

उमरेड (जि. नागपूर) मतदारसंघातील भाजपा – महायुतीचे उमेदवारच्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. आमदार कृपाल तुमाने, परिणय फुके, माजी आमदार राजू पारवे, आनंदराव राऊत, दिलीप सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. महायुतीला पुन्हा सत्ता दिल्यास विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना २५ हजार रु. एवढा बोनस देऊ, अशी घोषणाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत केली .

देवेंद्र फडणीस पुढे बोलताना म्हणाले की, २००९ साली सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी जमिनी खरेदी केल्या होत्या. मात्र तत्कालीन सरकारने त्यांना केवळ एक लाख रुपये मोबदला दिला. आपले सरकार आल्यानंतर आपण सारे नियम बाजूला ठेवत त्यांना दोन लाख रुपये मिळवून दिले. विदर्भ प्रकल्पग्रस्तांसाठी नवीन पॅकेज दिले. आता पुन्हा सत्तेवर येताच गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन समाधानकारक पद्धतीने करणार, असे आश्वासनही दिले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, या भागात आपण एमआयडीसी सुरू करत आहोत. पण केवळ एमआयडीसी सुरू करूनच आम्ही थांबणार नाही. तर तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी व्यवस्थाही करणार आहोत. या भागातील तारणा तलाव, कोलासुर टेकडी या प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यटनाच्या अत्याधुनिक सोयी देत हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करणार आहोत. केवळ उद्योग आणि पर्यटनच नव्हे तर सिमेंटकाँक्रिटचे रस्ते, पूल अशा पायाभूत सुविधाही निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.

देवेंद्र फडणवीस शेवटी सांगितले की, तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आपले सरकार आल्यावर १५ लाख रूपये बिनव्याजी कर्ज देणार आहे. शेतकऱ्यांसाठी कृषि पंप वीज बिल माफी, मागेल त्याला सौर पंप योजना, कृषी वीज वितरण कंपनीची स्थापना अशा अनेक योजना महायुती सरकारने आणल्या. एक रुपयात पीक विमा योजना आणून ८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. नमो किसान योजने अंतर्गत १२ हजार रूपये दिले. महायुती सरकार सत्तेवर येताच त्यात वाढ करत १५ हजार रुपये दिले जातील, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *