अंजली दमानिया यांच्याकडून मुंडे-कराड चा आणखी एक पुरावाः केली राजीनाम्याची मागणी राख विक्रीच्या कंपनीत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भागिदारी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आणि परळी तालुक्यातील दहशतीवरून मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील कथित आर्थिक संबध आणि वाल्मिक कराडच्या पाठिशी धनंजय मुंडेच असल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे. यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज आणखी एक पुरावा दाखवत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा अशी मागणी केली.

परळीतील औष्णिक ऊर्जा कंपनीकडून निर्माण होत असलेली राख जी महाजनको कडून टेंडर काढून विकली जाते किंवा ती मोफत दिली जाते. त्या राखेतून आतापर्यंत कोट्यावधी रूपयांची कमाई केली धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून केली जात असल्याची चर्चा सुरु होती. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज व्यंकटेश्वरा नावाच्या एका कंपनीतील भागिदारांची माहितीच उघड केली.

अंजली दमानिया यांनी उघड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे व्यंकटेश्वरा या कंपनीत यापूर्वी धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे या मेजर शेअर होल्डर आहेत. या कंपनीत संचालक म्हणून वाल्मिक कराड याचेही नाव होते. आजही या कंपनीत वाल्मिक कराड हे शेअर होल्डर म्हणून आहेत.

एकाबाजूला मेजर शेअर होल्डर म्हणून धनंजय मुंडे हे आहेत. धनंजय मुंडे हे राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत, तर महाजनको ही संपूर्णतः राज्य सरकारची सबसिडर कंपनी आहे. असे असताना मंत्रीच या या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.

पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, हा ऑफिस ऑफ प्रॉफिट या कायद्याचा भंग होत आहे. तसेच ते या कंपनीतील लाभार्थी असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा अशी मागणीही राज्य सरकारकडे केली आहे.

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा आणखी एक आर्थिक घोटाळ्याची कागपत्रे बाहेर काढताना अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी डिसीसी बँकेच्या घोटाळ्यात जग्नमित्र स्पिनिंग मिल प्रकरणी जामीन मिळविण्यासाठी धनंजय मुंडे यांचे वकील म्हणून ज्येष्ठ सरकारी वकील उज्जव निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम हे होते. आता या प्रकरणात सरकारी वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्त करण्याची मागणी होत असल्याचा मुद्दाही यावेळी अन्य एका एक्सवरील ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला.

त्याशिवाय पुढे आणखी एका एक्सवरील ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी गौप्यस्फोट करत म्हणाल्या की, वाल्मिक कराड याच्या विरोधात एफआयआर होईपर्यंत पोलिसांचे संरक्षण पुरविण्यात आले होते. त्यामुळे सराईत गुन्हेगाराला सरकारी अंगरक्षक पुरविण्यावरून कराडच्या जीविताला इतरांकडून धोका होता हे बुद्धीला पटण्यासारखे आहे का असा सवालहीही यावेळी उपस्थित केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *